राज्य पोलीस दलातील 7 पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलिस (police) आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश आज (बुधवार) गृहविभागाने काढले आहेत. गृहमंत्रालयाने सात पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत.

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण

1. अमोल नारायण ठाकूर – ( उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी उपविभाग, जिल्हा गडचिरोली.

2. निलेश श्रीराम पालवे – (सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)

3. सचिन धोंडीबा थोरबोले – (सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)

4. प्रमिल प्रफुल्ल गिल्डा – (उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली)

5. अश्विनी रामदास जगताप – ( सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)

6. राजश्री संभाजीराव पाटील – (उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा उपविभाग, जिल्हा सोलापूर)

7. सुनिल सदाशिव साळुंखे – (उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी उपविभाग, जिल्हा विर्धा)

तसेच दत्तात्रय आनंदराव पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा उपविभाग जिल्हा सोलापूर यांची बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.