राज्यातील 7 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक आयुक्‍तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने आज (बुधवारी) सायंकाळी राज्यातील 7 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक आयुक्‍तांच्या बदल्या केल्या आहेत.

बदली झालेल्या पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्‍तांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे.

उत्‍तम दामोदर कडलग (नाशिक ग्रामीण उपविभाग, नाशिक ते चाळीसगांव उपविभाग, जळगांव), रिना यादवरावजी जनबंधु (नागपूर ग्रामीण उपविभाग, नागपूर ग्रामीण ते भंडारा उपविभाग, भंडारा), प्रेरणा कट्टे (करवीर उपविभाग, कोल्हापूर – बदली आदेशाधीन ते कोल्हापूर शहर उपविभाग, कोल्हापूर), प्रशांत अमृतकर (कोल्हापूर शहर उपविभाग, कोल्हापूर ते करवीर उपविभाग, कोल्हापूर), विशाल वसंत नेहुल (आष्टी उपविभाग, बीड – बदली आदेशाधीन ते औरंगाबाद ग्रामीण उपविभाग, औरंगाबाद) आणि सुदर्शन मुंडे (कर्जत उपविभाग, अहमदनगर ते सिल्होड उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण). अमोल गायकवाड यांची दि. 29 ऑक्टोबर 2018 रोजी रोहा उपविभाग (रायगड) येथुन हिंगोली येथील वसमत उपविभाग येथे बदली करण्यात आली. मात्र, ती बदली या आदेशान्वये रद्द करण्यात आली आहे.

You might also like