वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा

मुंबईतील काही आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये ८ वरिष्ठ अधिका-यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार १९८५ साली नियुक्ती झालेले आयएएस अधिकारी एस .जे .कुंटे हे अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई याठिकाणी कार्यरत होते. त्यांना आता अतिरिक्त मुख्य सचिव (कार्मिक), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई पदी नियुक्त करण्यात आले आहे.

आयएएस अधिकारी मनोज सौनिक याची नियुक्ती १९८७ साली करण्यात आली होती. प्रधान सचिव (परिवहन आणि बंदर), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर काम करीत होते त्यांच्याकडे आता प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई येथील कार्यभार सोपवण्यात आला आहे.

तसेच आयएएस अधिकारी आशिष कुमार सिंह सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, मुंबई यांना प्रधान सचिव (परिवहन व बंदर), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई चे काम सोपवण्यात आले आहे.

याबरोबरच ,आयएएस अधिकारी एम.एम.सूर्यवंशी यांची आदिवासी विकास महामंडळ नाशिक येथील एम.एस.को-ऑप चे व्यवस्थापकीय संचालक पदी बदली करण्यात आली आहे. तर २०११ साली नियुक्त झालेले आयएएस अधिकारी संजय मीणा यांना ठाणे येथील अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. सतीश गवई यांची पर्यावरण विभागातून उद्योग विभागात बदली करण्यात आली आहे. सुनील पोरवाल हे गृह विभागाचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव असणार आहेत.

आतापर्यंत गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेले सुधीर श्रीवास्तव यांची बदली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव अनिल डिगीकर यांची बदली पर्यावरण विभागात करण्यात आली आहे.