राज्यातील सात वरिष्ठ् सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य सरकारने सात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी काढले आहेत. कोकण विभागाचे उपआयुक्त आता महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण आणि संशोधन समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

२००७ च्या बॅचचे सनदी अधिकारी पुणे कृषि आय़ुक्त असलेले सचिन्द्र प्रताप सिंह यांची बदली महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक म्हणून करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक एस. के. दिवसे यांची बदली पुणे कृषि आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एस. पगारे यांची बदली नागरी पुरवठा विभाग मुंबई येथे संचालक , नियंत्रक रेशनिंग येथे करण्यात आली आहे. कोकण विभागाचे उपआयुक्त एम. बी. वारभुवन यांची महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

राज्य जात पडताळणी समिती रत्नागिरी येथे अध्यक्ष असलेले डी. बी. हळदे यांची संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. कोकण विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त एच. एस. सोनवणे यांची कृषि आणि पणन विभागाच्या मंत्रालायातील सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सिडको नवी मुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी एस. एस. पाटील यांची सिडको नवी मुंबई चे सह व्यवस्थापकिय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

मोदींनी भर लोकसभेत उडवली महाआघाडीची खिल्ली|