जैन मंदिराजवळील रोहिञाला अचानक लागली आग

धुळे : पोलिसनामा ऑनलाईन – शहरातील मध्यवर्ती भागातील तेली पंचायत समोरील ग.न.2 मधील जैन मंदिरा समोर असलेल्या रोहिञाला जादा विद्युत प्रवाहामुळे अचानक आग लागली. त्यामुळे रोहिञात मोठा स्फोट होऊन मोठा आवाज झाला. तर वीज वाहक तार तुटली.

हा परिसर सायंकाळी गजबलेला असतो. इथे वाहनेही पार्कींग केलेली असतात. सुदैवाने कुठलीही हानी झालेली नाही. परिसरात आगीमुळे धावपळ झाली. आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. माहिती मिळताच काही मिनिटांतच घटनास्थळी दोन बंब दाखल झाले.

रोहिञाला आगीने वेढलेले होते. आगीवर नियंञण मिळविण्यासाठी केमिकल युक्त पावडर मिश्रणाचा कर्मचारी यांनी मारा केला व वीस मिनिटांत आगीवर नियंञण मिळविण्यात आले. आगीत रोहिञाचे युनिट व वायर पुर्ण जळाल्या असून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. ग.न.2 व पेठ या भागातील वीज पुरवठा पुर्णतः खंडित झाला आहे. उद्या सकाळी नविन रोहिञ लावल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे लालबाग वीज युनिट कर्मचारी यांनी सांगितले.