पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Transgender Aadhaar Card | भारतातील एक महत्वाचे कागदपत्र म्हणून आधार कार्डकडे (Aadhaar Card) बघितले जातेय. कोणत्याही खासगी अथवा सरकारी कामासाठी आधार कार्डची आवश्यकता लागते. आधार एक सगळ्यात महत्वाचं डाॅक्युमेंट आहे. असं असलं तरी तृतीयपंथीय म्हणजेच ट्रान्सजेंडर्समध्ये (Transgender Aadhaar Card) मात्र आधार कार्ड बद्दल जागरूकता कमी आहे. याचा विचार करता आता तृतीयपंथीयांनाही आधार कार्ड दिले जाणार आहे. या पार्श्वभुमीवर पुण्यात (Pune) एक विशेष शिबिर घेतले जाणार आहे.
बिंदू क्विअर राइट्स फाउंडेशन (Bindu Queer Rights Foundation (BQRF) या संघटनेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Pune Collector Office) सहकार्याने तृतीयपंथीयांसाठी आधार कार्ड शिबिराचे आयोजन केले आहे. BQRF चे संचालक बिंदुमाधव खिरे (Bindumadhav Khire) म्हणाले की, ”पुणे जिल्ह्यातल्या अनेक तृतीयपंथीयांकडे आधार कार्ड नाही.
तृतीयपंथीय म्हणून ओळखपत्र मिळण्यासाठी (Transgender Identity Card) आधार कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्र आहे. त्यामुळे अशा प्रकारचे शिबिर घेण्याची गरज भासली.
तृतीयपंथीयांना ओळखपत्र मिळवून देण्यात महाराष्ट्रात पुणे जिल्हा (Pune District) आघाडीवर असल्याचे,” ते म्हणाले. (Transgender Aadhaar Card)
दरम्यान, ”पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 125 तृतीयपंथीयांना अशी ओळखपत्रे मिळवून देण्यात आली असल्याची माहिती बिंदुमाधव खिरे यांनी दिली. ट्रान्सजेंडर ओळखपत्राच्या साह्याने (Transgender Identity Card) त्यांना योजनांचा लाभ मिळू शकतो. ‘तृतीयपंथीय समुदायातील आधार कार्ड नसलेल्या जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोहोचायचं आम्ही ठरवलं आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या व्यक्तींपर्यंत आम्ही स्वतः पोहोचत असून, हा संदेश त्यांच्यामार्फत जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केले जातेय. असं देखील ते म्हणाले.
Web Title :- Transgender Aadhaar Card | planning to organise special camp help transgenders get their aadhaar card pune news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pulses Benefits | डाळी-कडधान्यं खाण्याने वाढते वय 10 वर्षांनी, अमेरिकन शास्त्रज्ञांचा दावा