मेल स्टेज डान्सर ‘दीपक’चं मन भरल्यानंतर केलं लिंग परिवर्तन, आता बनला ‘दीपिका’

जोधपूर : वृत्तसंस्था – जोधपूरचा सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा कार्यक्रम करणारा दीपक डान्सर आता दीपिका नावाने ओळखला जात आहे. अलीकडेच त्याने आपले लिंग बदलून नवीन जीवन जगण्याचा विचार केला आहे. दीपक डान्सरने यापूर्वी बरेच स्टेज शो, सांस्कृतिक कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा, लग्न कार्यक्रम आणि इतर अनेक कार्यक्रम केले आहेत.

त्याने सांगितले की बर्‍याच दिवसांपासून त्याच्या मनात लिंग बदलण्याची इच्छा होती आणि त्याने अलीकडेच दिल्लीहून लिंग परिवर्तन केले. तो एक परिपूर्ण स्त्री बनला आहे.

लिंग परिवर्तन केल्यावर परत येताच त्याने गीतांजली सोनी यांच्याकडून मेकअप करून घेतला. सुमन प्रजापत यांच्याकडून ड्रेस व ज्वेलरी मेकअप केला. नंतर ती दीपक डान्सर नाही तर नवीन मॉडेल दीपिकाच्या रूपात दिसली.

मुलींचे कपडे घालून स्टेजवर नृत्य करण्याची त्याची सवय असल्यामुळे दीपकने असा विचार केला होता की, जर तो खरोखरच मुलगी असता तर कसा असता, याचा विचार करतच दीपक मोठा झाला आणि जोधपूरची प्रसिद्ध मारवाडी डान्सर झाला पण त्याच्या मनातली मुलगी होण्याची इच्छा संपली नाही, ती वाढतच गेली.

अखेर दीपकने लॉकडाऊनच्या ठीक आधी दीपिका होण्याचे ठरवले आणि लिंग परिवर्तनासाठी दिल्लीत शस्त्रक्रिया केली. सध्याच्या काळात लिंग परिवर्तन करणे हादेखील एक वेगळा ट्रेंड बनला आहे.

दीपक मारवाडीने ३ महिन्यांपूर्वी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केली आणि आता तो खूप आनंदी देखील आहे.

दीपिका बनलेल्या दीपकने सांगितले की, लहानपणापासूनच तो मुलींचे ड्रेस घालून नाचत असे आणि मुलींचा ड्रेस परिधान करायलाही त्याला आवडत असे. तसेच गेल्या १० वर्षांपासून जोधपूरसह आसपासच्या भागात लोकल स्टेजवर मारवाडी गाण्यांचा परफॉर्मन्स करत लोकांचे मनोरंजन करायचा, पण आता त्याला दीपिका मारवाडी बनून नृत्य क्षेत्रात पुढे बॉलिवूडमध्ये जायचे आहे.

दीपक मारवाडीने वेगवेगळ्या ठिकाणी परफॉर्मन्स देऊन अनेक प्रशस्तिपत्रे देखील मिळवली आहेत. जोधपूरचे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, महापौर घनश्याम ओझा, शहरातील अनेक आमदारांसह अनेक बड्या नेत्यांच्या हस्ते दीपक डान्सरला पुरस्कारही मिळाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like