Transgender Wants Scheme Like Majhi Ladki Bahin | बहीण, भाऊ नंतर तृतीयपंथीयांकडून ‘लाडका’ योजनेची मागणी ; मुख्यमंत्र्यांना केलं आवाहन

Transgender Wants Scheme Like Mazi Ladki Bahin | now maharashtra transgender wants scheme like Majhi Ladki Bahin demand to cm eknath shinde
File Photo

चंद्रपूर: Transgender Wants Scheme Like Majhi Ladki Bahin | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून (Mahayuti Govt) योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजनेची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच तृतीयपंथीयांकडून ‘लाडका’ योजनेची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाली आहे. तृतीयपंथीयांना देखील अशा योजनेचा लाभ व्हावा, आम्ही देखील समाजाचा घटक आहोत, आम्हाला देखील मतदानाचा अधिकार आहे, असं म्हणत आता तृतीयपंथीयांनी देखील या योजनेचा लाभ दिला जावा, अशी मागणी केली आहे.

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ सुशिक्षित बेरोजगारांसाठी योजना जाहीर केल्या आहेत. त्यातच आता या दोन्हींचा लाभ न मिळू शकणारा वर्ग अर्थात तृतीयपंथीयांनी आपल्यासाठी सरकारने ‘लाडका’ योजना जाहीर करावी अशी मागणी केली आहे. चंद्रपुरात मनसेच्या पुढाकाराने तृतीयपंथीयांच्या संघटनेने या विशेष योजनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तृतीयपंथीयांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. तृतीयपंथी समाज हा दुर्लक्षित आणि वंचित घटक असल्याची आठवण निवेदनातून करून देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यात बहिणी आणि भावांसाठी सरकारच्या योजना सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथीयांनी देखील आवाज उठवला आहे. राज्य सरकारच्यावतीने सध्या जाहीर करण्यात आलेल्या तृतीयपंथीयांसाठीच्या योजनांची देखील सुयोग्य अंमलबजावणी होत नसल्याचे मनसेने सरकारच्या लक्षात आणून दिले आहे. दरम्यान तृतीयपंथीयांच्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Triple Murder In Maval Pune | पिंपरी: मावळात तिहेरी हत्याकांड; गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू, मृतदेह नदीत टाकताना तिच्या दोन लेकरांनाही नदीत ढकललं

Bacchu Kadu On Amit Shah Statement | ‘शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार मग अजितदादा कोण?’; बच्चू कडूंचा अमित शहांना सवाल

Dhayari Pune Crime News | पुणे: ‘तु माझी झाली नाही तर…’ तरुणीचा पाठलाग करुन ब्लेडने वार करण्याची धमकी; धायरी परिसरातील घटना

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Rickshaw driver commits suicide by hanging himself after calling his sister due to wife's immoral relationship with friend; Police register case against wife and friend, incident in Handewadi

Pune Crime News | मित्राबरोबरच्या पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे रिक्षाचालकाने बहिणीला फोन करुन गळफास घेऊन केली आत्महत्या; पत्नी व मित्रावर पोलिसांनी केला गुन्हा दाखल, हांडेवाडी येथील घटना