‘ट्रान्सजेंडर बिला’विरोधात किन्नर समाज एकवटला, ‘या’ दिवशी जंतरमंतरवर आंदोलन

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभेमध्ये पास करण्यात आलेल्या ट्रान्सजेंडर बिलाविरोधात देशातील किन्नर समाज एकवटला असून, किन्नर बांधवांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी २० जानेवारीला दिल्ली येथील जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील २०० पेक्षा अधिक किन्नर समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती जन सत्याग्रह संगठन किन्नर सेल अध्यक्ष गुरू सिमरन नायक अम्माजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ज्याने जग दाखवले त्याचाच केला खून, मुलाला जन्मठेपेची शिक्षा 

लोकसभेत पास करण्यात आलेल्या ट्रान्सजेंडर बिलामुळे किन्नरांचे मौलिक अधिकाराचे हनन केले जात आहे. यामध्ये गुरू चेले हे नाते संपून टाकले गेले आहे. यासोबतच आनंद, उत्सवाच्या क्षणी देणात येणाऱ्या आशीर्वादप्रसंगी दान स्वीकारले जाते, त्याला भिक्षा पात्र ठरविण्यात आले आहे. तसेच किन्नरांना ओबीसी कॅटेगरीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, अनुसूचित जाती, जमातीमध्ये समाविष्ट असलेल्या किन्नरांकरिता कुठलेही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे ट्रान्सजेंडर बिल थांबविण्यात यावे, राज्यसभेमध्ये हे बिल पारित करण्यात येऊ नये, या बिलामध्ये सुधारणा करण्यात येऊन किन्नरांना रोजगार, संस्कृती जतन करण्याचा अधिकार हिरावून घेऊ नये.

याकरिता निषेध करण्यासाठी जंतरमंतर दिल्ली येथे २० जानेवारीला आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी गुरु सिमरन नायक अम्माजी यांच्यासह गुरु सिमरन अम्माजी, मुस्कान, मोगरा अम्मा जी, मुस्कान गुरु सिमरन, आलिया गुरु सिमरन, प्रिया गुरु, सना, मेघा, सारिका आदींसह किन्नर समाज बांधव उपस्थित होते.