15 ऑगस्ट : PM मोदींनी देशवासियांना केलं ‘हे’ आवाहन, म्हणले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील मोदी सरकारने देशातील प्रामाणिक करदात्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी नवी करप्रणाली जाहीर करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील करदात्यांना मोठी भेट दिली आहे. कर प्रणालीच्या नव्या व्यवस्थेचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पारदर्शी कर व्यवस्था-ईमानदारांचा सन्मान’ प्लॅटफार्मचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांकडून एक गोष्ट मागितली आहे. मोदींनी देशातील नागरिकांना प्रामाणिकपणे कर भरण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, गेल्या सहा वर्षांमध्ये Bankin the Unbankex, Securing the unsecured आणि Funding the Unfunded हे आमचे लक्ष्य राहिले आहे. ईमानदार करदात्यांची राष्ट्रनिर्माणात महत्त्वाची भूमिका आहे. जेव्हा करदात्यांचे जीवन सोपे होते तेव्हा तो पुढे जाऊ शकतो आणि त्यामुळे देश देखील पुढे जातो. आजपासून सुरु झालेल्या नवीन व्यवस्था देशवासियांच्या आयुष्यात सरकारची दखल कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. विदेशी गुंतवणुकीबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, विदेशी गुंतवणूकदारांचा देखील भारतावरील विश्वास वाढू लागला आहे. कोरोनाच्या संकटकाळात देखील मोठ्या प्रमाणात एफडीआय हा याचा पुरावा आहे.

गेल्या सहा-सात वर्षात कर विवरण भरणाऱ्याचं सख्या ही जवळपास अडीच कोटींनी वाढली आहे. ही मोठी वाढ आहे. मात्र, असं असताना 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात फक्त दीड कोटी लोक आयकर भरतात, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. तसेच आज मी देशवासियांना विनंती करतो, जे सक्षम आहेत त्यांनाही विनंती करतो. आपण सर्वांनी यावर विचार करणे गरजेचे आहे. स्वावलंबी भारतासाठी हे आवश्यक आहे. प्रत्येक भारतीयांचीही ही जबाबदारी आहे. दोन दिवसांनंतर 15 ऑगस्ट आहे. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं. त्यांचं स्मरण करा. देशासाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे असं तुम्हाला देखील वाटेल, असं मोदींनी म्हटले आहे.