आज भारत बंद, ट्रान्सपोर्ट आणि बँकिंग सेवेवर होणार परिणाम, जाणून घ्या का होत आहे देशव्यापी आंदोलन

नवी दिल्ली : सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात आज 26 नोव्हेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये 10 केंद्रीय यूनियनद्वारे संयुक्त संप करण्यात येत आहे. गुरुवारी 25 कोटीपेक्षा जास्त कामगार या देशव्यापी बंदमध्ये भाग घेण्याची शक्यता आहे. अनेक वाहतूक, बँक यूनियन्स या भारत बंदमध्ये सहभागी आहेत. भारत बंदमुळे देशभरात बँकिंग सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. आज रस्त्यावर कमी ऑटो आणि टॅक्सी असू शकतात. या दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने सर्व विभाग आणि महामंडळांमध्ये संपावर प्रतिबंध लावला आहे.

संपात कोण होत आहे सहभागी
केंद्रीय यूनियनमध्ये इंडियन नॅशनल ट्रेड यूनियन काँग्रेस, ऑल इंडिया ट्रेड यूनियन काँग्रेस, हिंद मजदूर सभा, भारतीय व्यापार संघाचे केंद्र, ऑल इंडिया यूनाइटेड ट्रेड यूनियन सेंटर, ट्रेडचा सहभाग आहे. यूनियन को-ऑर्डिनेशन सेंटर, सेल्फ-एम्प्लॉईड वुमन असोसिएशन, ऑल इंडिया सेंट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड यूनियन्स, लेबर प्रोग्रेसिव्ह फेडरेशन आणि यूनाइटेड ट्रेड यूनियन काँग्रेस सुद्धा सहभागी आहे. भारतीय मजदूर संघ संपात सहभागी होणार नाही.

या सेवांवर होणार परिणाम
उद्योग, बँकिंग, परिवहनसह अनेक सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. कारण एक दिवसीय संपात ट्रेड यूनियन मोठ्या संख्याने भाग घेत आहे.

शेतकरी, योजना मजूर, घरगुती कामगार, बांधकाम कामगार, विडी कामगार, फेरीवाले, विक्रेते, शेतमजूर, ग्रामीण आणि शहरी क्षेत्रांतील स्वयंरोजगार, ऑटो आणि टॅक्सी चालक, रेल्वे, सुरक्षा कर्मचारी सुद्धा संपात सहभागी होण्याची शक्यता आहे.

बँक सेवा प्रभावित होणार
ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन आणि भारतीय बँक कर्मचारी महासंघ संपात सहभागी होणार आहे. यामुळे बँकांचे सामान्य कामकाज प्रभावित होऊ शकते.

You might also like