सोमवार रात्रीपासून नगररोडवरील वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे ग्रामिण हद्दीतील पेरणेफाटा येथील विजय सणस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातील व राज्या बाहेरील दलित बांधव व दलित समाच्या संघटना येत असतात. त्यामुळे पुणे-अहमदनगर मार्गावरील पेरणे फाटा येथे होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा या मार्गावरुन नगरच्या दिशेने जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे.

दरम्यान, या मार्गावर पेरणे फाटा सणस्तंभाकडे जाणाऱ्या वाहनांनाच सोडण्यात येणार असल्याचे पुणे वाहतुक शाखेकडून कळविण्यात आले आहे. हा बदल सोमवार (दि.३१) रात्री नऊ ते १ जानेवारी रात्री १२ या वेळेत असणार आहे.

पुणे शहरातुन अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहन चालकांनी (पेरणेफाटा रणस्तंभाकडे जाणारी वाहने सोडून) खराडी बायपास येथुन उजवीकडे वळून हडपसर येथून सोलापूर महामार्गावरुन चौफुला येथुन डावीकडे वळून चौफुला न्हावरे मार्गे अहमदनगर कडे जावे.

सासवड व सातारा येथुन येणाऱ्या वाहन चालकांनी (पेरणेफाटा रणस्तंभाकडे जाणारी वाहने सोडून) हडपसर येथून सोलापूर महामार्गावरुन चौफुला येथुन डावीकडे वळून चौफुला न्हावरे मार्गे अहमदनगर कडे जावे.

पिंपरी चिंचवड या भागातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहन चलकांनी (पेरणेफाटा रणस्तंभाकडे जाणारी वाहने सोडून) खराडी बायपास येथुन उजवीकडे वळून हडपसर येथून सोलापूर महामार्गावरुन चौफुला येथुन डावीकडे वळून चौफुला न्हावरे मार्गे अहमदनगर कडे जावे.

वाहन चालकांनी पर्य़ायी मार्गाचा वापर करुन वाहतुक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पुणे वाहतुक शाखेकडून करण्यात आले आहे.