पुणे : वरंधा घाट दोन महिने वाहतुकीसाठी बंद

पुणे (भोर) : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत. भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील रस्ता खचल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वरंधा घाटातून होणारी वाहतूक दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे वरंधा घाटातील रस्ता ४ ऑगस्ट रोजी खचला आहे. वरंधा घाटातील रस्ता अनेक ठिकाणी खचला असून काही ठिकाणी दरडी पडल्या आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि दरडी काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. घाटातील भोर तालुक्याच्या बाजूला असलेल्या रस्त्याचे काम पुढील पंधरा दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, महाडच्या बाजूकडील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मोठे असल्याने त्याला दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती महाडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वरंधा घाटातील घाटमाथ्याजवळ मोठ्या वळणावरती रस्ता खचला आहे. तसेच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे हा रस्ता ४ ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होईल असे ही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like