गडकरींनी हात जोडले, दादांनी दखल घ्यावी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन 

महाराष्ट्रातील सर्वच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत विशेषता मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हात जोडले आहेत. त्यामुळे संबंधित खात्याचे मंत्री असलेले चंद्रकांत दादा पाटील यांनी त्याची दखल घ्यावी असा टोला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत लगावला. यावेळी त्यांनी मुंबईतील खड्ड्यांबाबत ओरडणार्‍या आशिष शेलार यांनाच विचारा असा प्रतिप्रश्‍नही यावेळी केला.

[amazon_link asins=’B07B6SN496,B0785JJF7L,B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a042633-ab70-11e8-853a-e3adff17fe32′]

शहरातील कच्छी भवन येथे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी रावते बुधवारी सांगलीत आले होते. मेळाव्यानंतर पत्रकारांशी त्यांनी विविध विषयावर संवाद साधला. एसटी महामंडळात आता अमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी एसटीच्या सेवेत अनेक बदल करण्यात आले आहेत. गेल्या पन्नास वर्षात महामंडळाने कोठेही बांधकाम केले नव्हते. आता राज्यात महामंडळातर्फे 200 ठिकाणी विविध प्रकारची बांधकामे सुरू आहेत असे रावते यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, पूर्वी एसटीच्या अपघातातील मृतांना फारच कमी भरपाई देण्यात येत होती. आता ती रक्कम दहा लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. सांगलीतील बसस्थानकाच्या बांधकामाबाबत आंतरराष्ट्रीय निविदा काढली आहे. त्याला अजून प्रतिसाद मिळाला नाही. राज्यातील सर्व बसस्थानकावरील शौचालये स्वच्छ तसेच व्यवस्थित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सांगलीतील आरटीओ कार्यालयासाठी नव्याने जागा मंजूर झाल्याची माहिती मिळाली आहे. त्या जागेची पाहणी करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयात न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ट्रॅक उभारण्याचे काम सुरू आहे. अर्थसंकल्पातून यासाठी निधी कमी पडत आहे तरीही निधी उभा करून ट्रॅक उभारण्याचे काम सुरू आहे असेही रावते यांनी यावेळी सांगितले. मराठा आरक्षणाला उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच पाठींबा दिला आहे. समाजाने मूक मोर्चे काढून एक चांगला आदर्श घालून दिला आहे. त्यांना आरक्षण मिळाल्यास त्याचे श्रेय कोणी घेतले याला महत्व नाही असेही एका प्रश्‍नाला उत्तर देताना रावते यांनी सांगितले.

खासदार-आमदाराच्या शाब्दिक वादात महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्याची उडी

निष्क्रीय पदाधिकारी बदलणार

सांगली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. सर्व मतदारसंघांचा आढावाही घेतला आहे. जे पदाधिकारी निष्क्रीय असतील त्यांना नक्कीच बदलण्यात येईल असेही रावते यांनी यावेळी सांगितले. यावेळी आनंदराव पवार, संजय विभूते, दिगंबर जाधव, शेखर माने, बजरंग पाटील, सुनीता मोरे उपस्थित होते.

गणेशोत्सवाची सुरुवात करण्यावरुन पुण्यात वाद पेटणार


…तर शिवसेनेलाच फायदा

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी भाजप आग्रही आहे याबाबत शिवसेनेची काय भूमिका आहे या प्रश्‍नावर रावते म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास त्याचा फायदा सर्वाधिक शिवसेनेलाच होणार आहे. त्यांनी या निवडणुका एकत्र घेतल्यास सेनेला काहीच फरक पडणार नाही. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपशी युती करण्याचा प्रश्‍नच येत नाही असेही रावते यांनी यावेळी सांगितले.
मेळाव्यात कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांची खरडपट्टी बुधवारी सकाळी रावते सांगलीत आले होते. सकाळपासून त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बंद खोलीत बैठका घेतल्या. त्यानंतर झालेल्या मेळाव्यात माध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला होता. मात्र या मेळाव्यात महापालिकेतील पराभव आणि पक्षाचे काम यावरून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रावते यांनी खरडपट्टी काढल्याचे सूत्रांनी सांगितले.

खुशखबर ! सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांचा महागाई भत्ता वाढला

[amazon_link asins=’B0756RF9KY,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d72fb713-ab72-11e8-a027-6ff9c85c8e71′]

Loading...
You might also like