खुशखबर ! बस-ट्रक चालक होण्याची इच्छा असणार्‍यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अल्पशिक्षित बस व ट्रक चालकांना दिलासा देणारी महत्वाची बातमी आहे. ट्रक, बससारखी अवजड वाहन चालकांना आठवी पास असणं यापुढं बंधनकारक असणार नाही. अवजड वाहनांच्या परवान्यासाठी लागू करण्यात आलेला किमान शैक्षणिक पात्रतेचा नियम रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्रालयानं घेतला आहे. वाहन चालवण्यासाठी शैक्षणिक पात्रता कमी करण्याची मागणी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.

‘या’ कारणामुळे नियम शिथिल –

शिक्षित चालकांकडून अपघात घडण्याची शक्यता कमी असते, असा निष्कर्ष काढून अवजड वाहनांच्या चालकांसाठी शैक्षणिक पात्रतेचा नियम ठेवण्यात आला होता. मात्र अपघातांच्या आकडेवारीनुसार यात तथ्य नसल्याचे निदर्शनास आले. मागील वर्षी देशात जेवढे अपघात झाले त्यापैकी बहुतांश चालक हे शिक्षितच होते.

वाहन चालवण्यासाठी शैक्षणिक पात्रता नव्हे, तर रहदारीचे नियम माहीत असणं गरजेचं आहे. यावरून सिद्ध झालं. तसेच या अटीमुळे अशिक्षित लोकांसाठी रोजगाराचे एक दार बंद होत असल्याचं परिवहन मंत्रालयाच्या निदर्शनास आलं. त्यामुळे चालक आठवी पासअसावा ही अट काढून टाकण्यात आली आहे.

सिने जगत – 

ऋतिकचा ‘हा’ जुना फोटो व्हायरल ; सोबत असलेली ‘ती’ लहान मुलगी आजची टॉपची अभिनेत्री

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका धक्‍कादायक वळणावर ; ‘चालतय की’ म्हणणारा राणा’दा’ ची ‘एक्झिट’

‘बेबी डॉल’ सनी लिओनी सुरू करणार ‘हा’ नवा ‘उद्योग’ !