गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस पुणे शहरातील वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. गणेश मूर्तींची खरेदी, सजावटीसाठी लागणारे साहित्यांची खरेदी करण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे वाहतूक शाखेने बुधवार (दि.१२) आणि गुरुवार (दि.१३) या दोन दिवशी वाहतूकीत बदल केला आहे. विशेषत: डेंगळे पूल ते शिवाजी पुतळ्यादरम्यान श्रमिक भवना समोर (आण्णाभाऊ साठे चौक), कसबा पेठ पोलीस चौकी, जिजामाता चौक ते मंडीपर्य़ंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूस अनेक स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी दोन दिवस वाहतूकीत बदल केले आहेत.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’88f3e033-b5a7-11e8-82bc-8f35a858b47e’]

वाहतुकीस बंद असलेले मार्ग

शिवाजी रोड – गाडगीळ पुतळा ते गोटीराम भैय्या चौक वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. यावेळी वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून- संताजी घोरपडे पथावरुन कुंभारवेस चौक ते शाहीर अमर शेख मार्गे इच्छितस्थळी जावे.

सू्र्या हॉस्पिटल समोरुन पवळे चौक, कमला नेहरुन हॉस्पिटल समोरुन १५ ऑगस्ट चौक, नरपतगिरी चौक मार्गे इच्छितस्थळी जावे.
शिवाजीनगर कडून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स.गो. बर्वे चौकातून डावीकडे वळन न घेता सरळ जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक मार्गे टिळक रोडने जावे.
[amazon_link asins=’B0756RF9KY,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8eb85147-b5a7-11e8-9571-ab474982cfc3′]

झाशीची राणी चौक ते खुडे चौक ते डेंगळेपुल मार्गे कुंभारवेसकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी खुडे चौकामधून मनपा पुणे समोरुन प्रिमीयर गॅरेज चौक शिवाजीपुल मार्गे गाडगीळ पुतळा चौक डावीकडे वळन घेऊन कुंभारवेस चौक या मार्गाचा वापर करावा.

कुंभारवेस चौक – डेंगळे पूल, साठे चौक ते कॉर्पोरेशन ब्रिज (शिवाजी पुल) सर्व प्रकारच्या वाहनांना बंद राहील. तसेच साठे चौक ते धान्य गोडावुन हा रस्ता देखील सर्व प्रकारच्या वाहनांना बंद राहील.पर्य़ायी मार्ग – पुणे स्टेशनकडून कार्पोरेशनकडे जाणाऱ्या वाहनांनी शाहीर अमर शेख चौकामधून कुंभारवेस मार्गे न जाता आरटीओ चौक, इंजिनिअरिंग कॉलेज चौक मार्गे जावे.

स्टेशन परिसरातून फरासखाना परिसरात जाणाऱ्या वाहनचालकांनी कुंभारवेस चौकामधून डावीकडे वळन घेऊन पवळे चौक मार्गे गणेश रस्त्यावर येऊन इच्छितस्थळी जावे.
[amazon_link asins=’B078BNQ313,B0746JXMWV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’96bd89e6-b5a7-11e8-af7e-034f3e0ff4ba’]

सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड) दरम्यान वाहतूक सुरु राहील. मात्र, यावेळी कोणत्याही प्रकारची वाहने पार्क करता येणार नाहीत. तसेच आवश्यकतेप्रमाणे बॅरिकेटस व दोरचा वापर केला जाईल.

वाहतूक सुरु असलेले मार्ग

फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरुज

आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक

सोन्या मारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक

मंगला टॉकिज समोरील प्रिमीयर गॅरेज लेनमधून शिवाजीरोड ते खुळे चौक (यादरम्यान जड वाहनांना याठिकाणी प्रवेश बंद राहील)
पीएमपीएमएल बसेसबाबत
[amazon_link asins=’B077RV8CCY,B01951R2S2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9f817ef2-b5a7-11e8-bc33-9d01dc62ca8c’]

शिवाजीनगर स्टॅडवरुन शिवाजीरोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या बसेस ह्या स.गो.बर्वे चौकातून शिवाजीपुलावरुन जाण्याऐवजी स.गो. बर्वे चौकामधून जंगली महाराज रोडने टिळक चौक मार्गे टिळक रोडने स्वारगेटकडे जातील.

कार्पोरेशन बसस्टॉप येथून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसेस ह्या झाशीराणी चौक मार्गे जंगली महाराजरोडने स्वारगेटकडे जातील.

कार्पोरेशन बसस्टॉप येथून पुणे स्टेशकडे जाणाऱ्या बसेस साठे चौक, कमगार पुतळा मार्गे पुणे स्टेशनकडे न जाता खुडे चौकातून पुणे मनपा समोरुन डावीकडे वळुन शिवाजी चौक स.गो. बर्वे अंडरपास, सिमला ऑफिस चौक, उजवीकडे वळून संचेती अंडरपास, कामगार पुतळा मार्गे शाहीर अमर शेख चौकामधून पुणे स्टेशनकडे जातील.
[amazon_link asins=’B00SAX9X6G,B01DU5OJCQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a6ae810c-b5a7-11e8-8148-c36ec78bef53′]

पार्किंग व्यवस्था

मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा कॅनोल पुलापर्य़ंत

जमनालाल बजाज बुतळा ते पुरम चौक रस्त्याचे डाव्या बाजूस

निलायम ब्रिज ते सिंहगड रोड जंक्शन

गणेश मूर्ती खरेदीसाठी येणाऱ्यांसाठी पार्किंग व्यवस्था

न्या. रानडे पथावर कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा या दरम्यान रस्त्याचे कोर्टाकडील एका बाजूस.

वीर संताजी घोरपडे पथावर मनपा बिलभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौक याा रस्त्याचे दोन्ही बाजूस.

टिळक पुल ते भिडे पुल दरम्यानचे नदीपात्रातील रस्त्यावर

मंडई येथील मिनर्व्हा व आर्यन पार्किंग तळावर

शाहू चौक (फडगेट चौकी चौक) ते राष्ट्रभुषण चौक – फक्त रस्त्याचे डावे बाजुस

पोलीसनामा न्युज
ब्रेकिंग न्यूज तसेच राज्यातील आणि देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा… आणि मिळवा पोलीसनामा च्या प्रत्येक बातमीची लिंक