आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरामध्ये उद्या (बुधवार) आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत आहे. आण्णाभाऊ साठे जयंतीनिमीत्त शहरातील विविध ठिकाणची स्थानिक मंडळे व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सारसबाग येथील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येत असतात. तसेच मिरवणूकीने पुष्पहार अर्पण करण्यासाठी येत असतात. त्यामुळे जेधे चौक ते सारबाग हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहन चालकांनी बंद करण्यात आलेल्या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेच्यावतीने करण्यात आले आहे. या रस्त्यांवर अत्यावश्यक सेवेतील फायर ब्रिगेड, पोलीस, रुग्णवाहिका खेरीज इतर वाहनांना वाहतूकीसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.
[amazon_link asins=’B014UM2QB4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’751fcf10-94cf-11e8-917b-0584c8266f53′]
वाहन चालकांनी जेधे चौक ते सारबाग या मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करावा.

पर्यायी रस्ता – 1) जेधे चौकाकडून सिंहगड रोडला जाण्यासाठी होल्गा चौक – मित्रमंडळ चौक – सावरकर चौक २) सिंहगड रोडकडून स्वारगेटकडे जाण्यासाठी सावरकर चौक – मित्रमंडळ चौक- व्होल्गा चौक – जेधे चौक या मार्गाचा वापर करावा.

जेधे चौकातील वाय जंक्शन (फ्लायओव्हर) वरुन सारबागेकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

पर्यायी रस्ता – कात्रजकडून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी ब्रीजवरुन न जाता ब्रीजखालून लक्ष्मीनारायण चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे.

पुरम चौक ते जेधे चौक या रस्त्यावरील एकेरी मार्गात वाहनांना आवश्यकतेनुसार सायंकाळी पाच ते रात्री दहा पर्यंत शथीलता दवून दुहेरी प्रवेश देण्यात येणार आहे.

बदल करण्यात आलेल्या मार्गावर परिस्थितीनुसार बदल करण्यात येणार असून वाहन चाकांनी उपलब्ध करुन दिलेल्या पर्य़ायी मार्गाचा वापर करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असेह आवाहन करण्यात आले आहे.