२ हजाराची लाच घेताना २ पोलीस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात ; १ फरार

कराड (सातारा) : पोलीसनामा ऑनलाइन – ट्रॅव्हल्स बसवर कारवाई न करण्यासाठी प्रतिमहिना दोन हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्विकारताना दोन पोलीस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडेल. मात्र, कारवाईच्या भीतीने एका पोलीस हवालदाराने घटनास्थळावरून पलायन केले.
दरम्यान एकाच वेळी दोघांवर कारवाई करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ही कारवाई कराड येथील कोल्हापूर नाका येथे करण्यात आली.

विठ्ठल विष्णू चव्हाण (वय-४९ रा. सैदापूर, कराड) असे पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तर अभिजित जनार्दन थोरात (रा. कराड) हा फरार झाला आहे. चव्हाण आणि थोरात हे दोघे कराड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार यांचा दोन ट्रॅव्हल्सच्या गाड्या आहेत. चव्हाण आणि थोरात यांनी कारवाई टाळण्यासाठी प्रतिमहिना दोन हजार रुपयांची लाच मागितली. चव्हाण लाचेची मागणी करत असताना थोरात याने तक्रारदाराला लाच देण्यास प्रवृत्त केले. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. कराड येथील कोल्हापूर नाका येथे पथकाने सापळा रचला. रात्री चव्हाण याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तर त्याचा साथीदार थोरात हा कारवाईच्या भीतीने पळून गेला.

पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदार विठ्ठल चव्हण आणि फरार अभिजीत थोरात यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार रात्री उशीरा कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी फरात अभिजीत थोरात याचा शोध सुरु केला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक बातम्या

सदैव तरूण दिसण्यासाठी करा ‘या’ व्हिटॅमिनचे नियमित सेवन

जाणून घ्या – कोणत्या ऋतूत कोणत्या ‘भाज्या’ खाव्यात

सर्दीकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो दम्याचा त्रास

महिलांनी पालेभाज्या खाल्ल्या तर नेहमी राहतील फिट