लोणावळ्यात कचरावेचकांच्या मुलांचा कृत्रिम तलावात बुडून मृत्यू

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन

लोणावळ्याच्या वरसोली टोल नाक्याजवळ असलेल्या ठिकाणी दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी साडे आठच्या सुमारास घडली आहे. कचरा डेपो मधील प्रस्तावित कचरा विघटन प्रकल्पाचे बांधकाम सुरू होते, त्यासाठी कृत्रिम तलाव बांधण्यात आला आहे. तिथेच पावसाचे पाणी साचले होते.आतील परिसरात हे दोघे खेण्यासाठी गेले होते. तेंव्हा ते बुडाले आणि यात दोघांचा ही मृत्यू झाला आहे.

सोनु रफिक शेख वय-१४ अस मृतदेह सापडलेल्या मुलाचे नाव असून, दुसऱ्या मुलाचे नाव अस्लम मुजावर शेख वय-१६ हे असून याचा शोध सुरू आहे.
[amazon_link asins=’B00WXYP6XM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5eb1ddb5-7ac9-11e8-b353-43e1fa22e7e8′]

सोनू आणि अस्लम हे दोघे जण मित्र असून कचरा वेचकांची मुलं आहेत, ते कचरा विघटन प्रकल्पाच्या बाहेर असलेल्या जागेत राहतात. कचरा डेपो मधील बांधकाम सुरू असलेल्या परिसरात खेळण्यासाठी आले होते. त्यावेळी खेळता खेळता कृत्रिम तलावात पडले मात्र वर येण्यासाठी त्यांना जागा नव्हती, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, अस सांगण्यात येत आहे. ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास लोणावळ्यात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस दाखल झाले होते, तसेच शोध कार्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टीम दाखल झाली आहे. या घटनेमुळे कचरावेचक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.