Mumbai : लिफ्टमध्ये अडकलेल्या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, CCTV मध्ये कैद झाली घटना

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : मुंबईतील धारावी भागात एक वेदनादायक घटना समोर आली आहे. येथे लिफ्टमध्ये अडकल्यामुळे पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना लिफ्टमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

दरम्यान, मुंबईतील धारावी परिसरातील घोषी शेल्टर इमारतीच्या लिफ्टमध्ये हा अपघात झाला. खरं तर तीन भावंड चौथ्या मजल्यावर येण्यासाठी तळ मजल्यावरून चढले. सुमारे एक वाजण्याच्या सुमारास तीन मुले खेळत असताना लिफ्टमध्ये चढली आणि लिफ्टचे बटण दाबले गेले. काही क्षणात ही लिफ्ट तळ मजल्यावरून चौथ्या मजल्यावर आली, पहिल्यांदा दोन मुली बाहेर आल्या त्यानंतर पाच वर्षांच्या हुजैफा बाहेर पडत असताना लिफ्टचा लाकडी दरवाजा बंद झाला. हुजैफा लिफ्टच्या बाहेर आणि लाकडी दरवाज्यात अडकून बसला आणि दुुसऱ्या क्षणी लिफ्ट सुरू झाली. हुजैफा देखील लिफ्टसह खाली उतरला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आलेल्या अग्निशमन दलाच्या मदतीने हुजैफाला बाहेर काढले. या घटनेत साहू नगर पोलिस एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

You might also like