पुणेकर करतायत जुन्या बसमधून प्रवास !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पीएमपी च्या ताफ्यात असलेल्या बसचे सरासरी वयोमान 9 वर्ष इतके झाले आहे. ही माहिती पीएमपी प्रशासनाने सर्व साधारण सभेत दिली.

पीएमपी करिता २४० सीएनजी बस खरेदी साठी पीएमपीएमएलला ११६ कोटी रुपये टप्प्याने उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक चेतन तुपे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकारी सुनील बोरसे यांनी पीएमपी कडील बसचे वयोमान सरासरी ९ वर्षे असलेल्याचे सांगितले. मुंबई आणि नाशिक या शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील बसचे सरासरी वयोमान ४ वर्ष असल्याचे पीएमपीचे संचालक आणि नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे यांनी नमूद केले. यावेळी चर्चेत सत्ताधारी भाजपवर राष्ट्रवादी कांग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार टिका करतानाच ४०० डिझेल वरील बस खरेदी करण्याऐवजी सर्व ई-बसेस घेण्याची मागणी करीत कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ई-बस चे तंञज्ञान नवीन असुन, तेवढ्या संख्येने ई-बस उपलब्ध होऊ शकणार नाही. या ई-बसेसचा अनुभव लक्षात घेऊन पुढे टप्प्याने ५०० ई-बस खरेदी केल्या जातील. लवकरच २५ ई-बस ताफ्यात दाखल होतील असे ही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

डिझेल वरील बस च्या संचलनासाठी प्रति किलोमीटर २५ रुपये, सीएनजी बसला प्रति किलो मीटर २० रुपये आणि इलेक्ट्रिक बसला प्रति किलो मीटर ८ रुपये इतका खर्च येतो. ई-बसची संख्या वाढली तर संचालनातील तुट कमी होण्यास मदत होईल असा दावा प्रशासनाने केला.