‘कोरोना’च्या काळात मुलांबरोबर बाहेर पडताना अन् प्रवास करताना ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणू साथीच्या काळात जनजीवन पुन्हा रुळावर आले आहे. लोक आता घराबाहेर पडत आहेत. मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा, शाळा, महाविद्यालये, जिम सेंटर, सिनेमागृह, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स सुरू करण्यात आली आहेत. तर बस, रेल्वे आणि हवाई सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. तथापि, कोरोना विषाणूची लागण होणार्‍यांची संख्या अद्याप कमी झालेली नाही. यामुळे आरोग्य विभाग आणि रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रांनी लोकांना घरातून बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्यासंदर्भात सल्ला दिला आहे.

कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव करण्यासाठी आणि संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लोक मास्क घालून घराबाहेर पडत आहेत आणि शारीरिक अंतराची देखील काळजी घेत आहेत. त्याच वेळी नको त्या वस्तूंना स्पर्श करणे देखील टाळत आहेत. वयाने मोठे असणारे लोक तरी नियमांचे पालन करतात पण जेव्हा लहान मुलांचा प्रश्न येतो तेव्हा तेथे शंका उपस्थित होते. विशेषतः प्रवासादरम्यान मुलांविषयी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपण आपल्या मुलांसह प्रवास करणार असाल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्याबाबत जाणून घेऊया…

साथीच्या आजाराबाबत सांगा
जर आपल्या मुलास कोरोना विषाणूच्या साथीबद्दल माहिती नसेल तर आपल्या मुलास त्याबद्दल तपशीलवार सांगा. विशेषतः बचावाच्या पद्धती शिकवा. त्यांना मास्क घालण्याचा, सॅनिटाइझ करण्याचा, शारीरिक अंतराचे अनुसरण करण्याचा आणि नको असलेल्या वस्तूंना स्पर्श न करण्याचा सल्ला द्या. तसेच, स्वतःच स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी याबद्दल देखील त्यांना सांगा.

पर्सनल किट प्रदान करा
जर तुमचे मूल मोठे असेल आणि बॅग बाळगू शकेल तर मुलाला एक लहान बॅग द्या. बॅगमध्ये मास्क, सॅनिटायझर, टिश्यू इ. ठेवा. मुलाला प्रवासादरम्यान त्यास वापरण्याची सूचना द्या.

घरून खाद्यपदार्थ घेऊन जावे
कोरोना कालावधीत प्रवासादरम्यान घरगुती खाद्यपदार्थ सोबत घेऊन जाणे योग्य राहील, कारण मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. म्हणूनच बाहेरील खाद्यपदार्थांऐवजी मुलांना घरगुती खाद्यपदार्थ द्या.

आधीपासूनच योजना आखून ठेवा
कोरोना विषाणू साथीच्या वेळी मुलांसमवेत प्रवास करण्यासाठी एक विशेष योजना आखणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची यादी तयार करा. त्याचबरोबर योग्य जागेची निवड करा, जेणेकरून तेथे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी असेल. जर आवश्यक नसेल तर मुलांना सोबत घेऊन जाऊच नये.