Travellers Choice Award 2021 : जगातील 25 फेव्हरेट टुरिस्ट डेस्टिनेशन, भारताच्या ‘या’ 3 शहरांनी सुद्धा मारली बाजी

नवी दिल्ली : ट्रिप अ‍ॅडव्हायजरने ’ट्रॅव्हलर्स चॉईस अवॉर्ड 2021’ ची घोषणा केली आहे. यामध्ये पर्यटकांसाठी 25 मोस्ट फेव्हरेट डेस्टिनेशनची यादी जारी केली आहे. यादीमध्ये इंडोनेशियाच्या बाली शहराला प्रथम स्थान देण्यात आले आहे. मात्र, आनंदाची बाब म्हणजे यामध्ये भारतातील सुद्धा तीन मोठ्या शहरांनी बाजी मारली आहे. या टॉप-25 टूरिस्ट डेस्टिनेशनबाबत जाणून घेवूयात…

बाली, इंडोनेशिया-
इंडोनेशियातील शहर बाली स्वर्गापेक्षा कमी नाही. यामुळेच अमेरिकेची प्रसिद्ध ट्रॅव्हल वेबसाइट ट्रीप अ‍ॅडव्हायजरच्या ’ट्रॅव्हलर्स चॉईस अवॉर्ड’ च्या यादीत बाली सर्वात पॉप्युलर डेस्टिनेशन म्हणून समोर आले आहे. बाली एक अतिशय सुंदर शहर आहे, जिथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. हे ठिकाण सुंदर समुद्र किनार्‍यांसाठी खुप प्रसिद्ध आहे.

लंडन, युनायटेड किंगडम-
प्रत्येक ट्रॅव्हलर जीवनात एकदा तरी युरोपियन देशांमध्ये फिरण्याचे स्वप्न जरूर पहातो. येथे लंडन सारखे सुंदर ठिकाण आहे. लंडनला स्वप्नातील जग म्हटले जाते. लोकांच्या अधुनिक लाइफस्टाइलसाठी प्रसिद्ध हे आकर्षक शहर थोडे महाग असले तरी चांगले आहे.

दुबई, यूएई-
पहिल्या दृष्टीक्षेपात दुबई एक उंच इमारतींचे व्यस्त शहर वाटेल, पण या शहरात पर्यटकांसाठी खुप काही आहे. उंटाची सवारी ते बेली डान्सपर्यंत आणि उंच इमारती आणि शाही खाण्यापर्यंत, प्रत्येक वस्तू दुबईला सुंदर बनवते.

पॅरिस, फ्रान्स-
जर तुम्ही किस्से आणि कथांमध्ये कुणाशी प्रेम होण्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नसाल तर पॅरिस तुम्हाला पूर्ण विश्वास देईल. ’सिटी ऑफ रोमान्स’च्या नावाने प्रसिद्ध हे शहर जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे, जी त्याची खासियत आहे.

रोम, इटली-
रोमच्या प्राचीन लोकांनी या शहराला ’अनादी’ नाव दिले आहे. पर्यटकांमध्ये हे शहर आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. शहरातील स्मारके आणि पुरातन स्थळे पाहण्यासाठी लोक येथे जगभरातून येतात.

हनोई, व्हिएतनाम –
व्हिएतनामचे हनोई शहर सुद्धा जगातील सर्वात चांगल्या टुरिस्ट डेस्टिनेशनमध्ये येते. येथील ऐतिहासिक म्यूझियम आणि ओपेरा हाऊसपासून आकर्षक मंदिरे हनोईचे सौंदर्य खुलवतात.

क्रीट, ग्रीस


बँकॉक, थायलँड –
बँकॉक थायलँडची राजधानी आहे. आपल्या सुंदर डेस्टिनेशनसाठी हे ठिकाण संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या शहरातील रात्र अतिशय सुंदर असते. बहुतांश भारतीयांसाठी बँकॉकच त्यांचे पहिले इंटरनॅशनल टुरिस्ट स्पॉट बनते.

बार्सिलोना, युरोप-
यूरोपच्या सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी बार्सिलोना सुद्धा एक आहे, जे अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. या शहरातील सुंदर समुद्र किनारे, स्वादिष्ट जेवण आणि आनंदी लोक तुमच्या कधीही न विसरता येणार्‍या आठवणी बणू शकतात.

इस्तानबुल, तुर्की-
तुर्की जगातील एकमेव असे शहर आहे जे दोन बेटांमध्ये वसलेले आहे. तुर्कीचे मोठे शहर इस्तानबुलमध्ये वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक राहातात. हे शहर आपली प्राचीन संस्कृती आणि परंपरांसाठी ओळखले जाते.

होई एन, व्हिएतनाम –
होई एन व्हिएतनामचे एक असामान्य शहर आहे. व्हिएतनामला पोहचल्यानंतर होई एन पर्यंत जाण्यासाठी कोणतेही विमानतळ किंवा रेल्वे स्टेशनसुद्धा नाही. येथे केवळ रस्तेमार्गाने जाता येते. हे ठिकाण टुरिस्टच्या खुप पसंतीचे आहे.

सिएम रीप, कम्बोडिया-
आपली आगळीवेगळी मंदिरे, प्राचीन गुहा आणि अद्भुत जलमार्गांसाठी प्रसिद्ध सिएम रीप ला दक्षिण-पूर्व आशियाचा दागिना म्हटले जाते. या ठिकाणी लोकांकडून मिळालेला सन्मान टुरिस्ट नेहमी लक्षात ठेवतात. शहराच्या केंद्रापासून सुमारे चार मैल दूर अंगकोर वाट मंदिर आहे, जे शहराचे सर्वात मोठे पर्यटन स्थळसुद्धा आहे.

माराकेच, मोरक्को –
मोरक्कोचे माराकेच एक शहर असे आहे, जिथे जाण्याची प्रत्येक टुरिस्टची इच्छा असते. येथील स्नानगृह तुम्हाला खास अनुभव देतात. या शहराचा प्रवास तुमच्यासाठी स्मरणीय होऊ शकतो.

फुकेट, थायलँड-
जर तुम्हाला समुद्र किनारे आवडत असतील तर थायलँडच्या फुकेटसारखे दुसरे कोणतेही ठिकाण नाही. सफेद वाळू, स्वादिष्ट खजूर, समुद्राचे सुंदर किनारे आणि जीवंत शहराचे वातावरण तुम्हाला परतू देणार नाही.

नवी दिल्ली भारत –
भारताची राजधानी दिल्ली सुद्धा जगातील सर्वात पसंतीच्या टुरिस्ट स्पॉटपैकी एक आहे. अनेक मोठी मंदिरे, शॉपिंग मॉल, प्राचीन संस्कृती राजधानी दिल्लीचे आकर्षण आहे. येथील फूड स्टॉल्स आणि रंगबेरंगी बाजारांमुळे सुद्धा दिल्ली पर्यटकांच्या हृदयात विशेष स्थान बनवते.

कॅनकन, मेक्सिको-
कॅनकन या ठिकाणाचे सूर्यप्रकाश, सफेद वाळू आणि आनंददायी वातावरण असे वर्णन केले जाऊ शकते. फॅमिलीसोबत सुट्टी घालवण्यासाठी ही जागा एकदम योग्य आहे.

पलाया डेल कारमेन, मेक्सिको-
पाणबुडे किंवा स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेणारांसाठी पलाया डेल कारमेन सर्वात चांगले ठिकाण आहे. येथे तुम्ही पाण्याच्या आत विविध प्रजातीच्या जीवांचे सुंदर जग पाहू शकता.

फ्लोरेन्स, इटली-
कलेची आवड असलेल्या लोकांना इटलीचे फ्लोरेन्स शहर खास अनुभव देते. हे शहर मायकल अँजेलोच्या आठवणी दर्शवते. वास्तुकलेला जवळून समजणारे लोक येथील प्राचीन ’पोंटे वेकोयओ’ पुलाचे तोंडभरून कौतूक करतात.

उदयपुर, भारत-
भारताच्या राजस्थानमधील उदयपुर शहर पर्यटकांच्या हृदयात एक विशेष स्थान बनवते. उदयपुर आपले ऐतिहासिक किल्ले, भव्य महाल, प्राचीन मंदिरे, संग्रहालय, सण आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. परदेशातून आलेले बहुतांश पर्यटक येथे थांबणे पसंत करतात.

टेनेराइफ, स्पेन-
टेनेराइफ स्पेनचे एक बेट आहे. एक बेट असूनही, टेनेराइफ आदिवासी समाजाचा प्रभाव दर्शवते. येथे जाण्यासाठी फेब्रुवारी सर्वात अनुकुल काळ आहे. येथे कार्निव्हल उत्सव तुमच्या जीवनातील सर्वात स्मरणीय क्षण होऊ शकतो.

लिस्बन, पोर्तुगाल –
सात पर्वतांमध्ये वसलेले हे विशाल शहर पोर्तुगालची राजधानी सुद्धा आहे. या शहरातील सुंदर रात्र तुमच्या मनातून घर करते. रंगबेरंगी बाजार, नाईटलाइफचे सुंदर दृश्य आणि संग्रहालयाच्या आठवणी सतत तुमच्या सोबत राहतील.

न्यूयॉर्क, अमेरिका-
महागडी हॉटेल्स, स्वादिष्ट पदार्थ, अलिशान रस्ते आणि विशेष लाइफस्टाइल न्यूयॉर्कची ओळख आहे. तुम्ही पहिल्यांदा येथे जा किंवा अनेकदा जा, न्यूयॉर्क प्रत्येक वेळी तुम्हाला आश्चर्यचकित करते. कलाकृतींची ठिकाणे आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे उत्कृष्ट दर्शन या शहरात होते.

एडनबर्ग, युनायटेड किंगडम-
स्कॉटलँडची राजधानी एडनबर्ग आपली परंपरा, संस्कृती आणि सणांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. ओल्ड टाऊन आणि न्यू टाऊनच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्ससह येथे संग्रहालये आणि फिरण्यासाठी ठिकाणांची कमतरता नाही.

जयपुर, भारत-
राजस्थानचे जयपूर संपूर्ण जगात पिंक सिटीच्या नावाने प्रसिद्ध आहे. महिलांची शाही परंपरा आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी जयपुर बेस्ट टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. अनेक पर्यटक शहरातील जुन्या रस्त्यांवर फिरणे पसंत करतात.

कुस्को, पेरु-
पेरू चा सुंदर रेनबो माऊंटन पाहण्यासाठी संपूर्ण जगातून पर्यटकांची गर्दी वर्षभर असते. पेरूमध्ये 17 हजार फुटाच्या उंचीवर मोन्टाना डी सिएट कोलर्स आहे. ही पर्वतरांग कुस्को क्षेत्रात एंडीज पर्वतरांगेत आहे. हा पर्वत पाहण्यासाठी जगभरातून चार लाख पर्यटक दरवर्षी येतात.

सर्व छायाचित्रे – (सोशल मीडिया)