सावधान ! ‘वेटिंग’च्या तिकीटवर रेल्वे प्रवास हा गुन्हा, ‘या’ 10 गोष्टी जाणून घ्या अन्यथा दंड आणि कारवाई देखील
पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारतात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तसेच रेल्वेचा प्रवास अतिशय स्वस्त मानला जातो. ज्याला कोणाला आरक्षित (reserved ) डब्यातून प्रवास करावयाचा असतो त्याला तसे अगोदरच तिकीट बुक करावे लागते. बुक केलेले तिकीट कन्फर्म नसेल आणि वेटिंग असेल तर वेटिंग तिकिटावर प्रवास करणे महागात पडू शकते.
आरक्षित (reserved) केलेले तिकीट जर प्रतीक्षेत (waiting) वर असेल आणि प्रवास केला तर तो सुद्धा गुन्हा ठरणार आहे. तिकीट जरी रेल्वे काउंटर वरून काढले असेल आणि कन्फर्म नसेल तरीही त्या तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास करता येणार नाही. अशा वेटिंग तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास जेलची हवा खावी लागू शकते.
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार वेटिंग तिकिटावर प्रवास करणे हे विनातिकीट प्रवास केल्यासारखेच आहे. जर आपण वेटिंग तिकीट घेऊन आरक्षित डब्यातून प्रवास करत असाल तर टीटीई (Travelling Ticket Examiner) तुम्हाला डब्यातून बाहेर काढून टाकू शकतो. सोबतच रेल्वे अॅक्ट १९८९ नुसार आपल्या विरोधात न्यायालयीन कारवाई होऊ शकते. रेल्वे अॅक्टच्या कलम ५५ मध्ये विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा मानला आहे. ज्यासाठी कलम १३७ नुसार ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.
आपण जर आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट बुक केलेले असेल आणि ते कन्फर्म झाले नसेल तर ते आपोआप रद्द होऊन पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतात. परंतु, रेल्वे काउंटर वरून काढलेले तिकीट आपोआप रद्द होत नाही. ते रेल्वे काउंटर वर जाऊनच रद्द करावे लागते.
जर आपण रेल्वे कांऊटर वरून तिकीट घेतले असेल आणि ते कन्फर्म नसेल तर अशा परिस्थितीत आपण केवळ जनरल डब्यातून प्रवास करू शकतो. याव्यतिरिक्त रेल्वे किंवा आईआरसीटीसी ज्याच्या नावाने तिकीट देते केवळ त्या व्यक्तीलाच त्या तिकिटावर प्रवास करता येतो. कोणी दुसरा व्यक्ती कोण्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या तिकिटावर प्रवास करू शकणार नाही. जर कोणी दुसऱ्या एखाद्याच्या तिकिटावर प्रवास करत असेल तर त्याच्या विरोधात कारवाई केली जावू शकते. कळत- नकळत रेल्वेच्या एखाद्या नियमाचे उल्लंघन झाल्यास आपल्याला तुरुंगात सुद्धा जावे लागू शकते आणि दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे आपल्याला खालील काही गोष्टी ज्या रेल्वेच्या नियमांशी जोडल्या आहेत. त्या आपल्याला माहिती असणे अतिशय महत्वाचे आहे.
या १० गोष्टी जाणून घ्या
१. रेल्वे मध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांमध्ये कोणत्याही पुरुषाने प्रवेश करणे हा गुन्हा आहे. जर कोणी महिला डब्यात प्रवेश केले तर त्याला दंड होवू शकतो. तसेच टीटीई अशा पुरुषाला डब्यातून बाहेर काढू शकतो.
२. रेल्वे अॅक्टच्या कलम १५६ नुसार जर कोणी रेल्वेच्या छतावर, सीडी, दरवाजा अथवा इंजिन मध्ये बसून प्रवास केल्यास ३ महिने कारावास होऊ शकतो. सोबतच दंडही होऊ शकतो.
३. रेल्वे अॅक्टच्या कलम १६७ नुसार रेल्वे मध्ये धूम्रपान करणे गुन्हा आहे. जर कोणी धूम्रपान करत असेल तर त्यास दंड होऊ शकतो.
४. प्रवासादरम्यान प्रवास संपल्यानंतर टीटीईने तिकीट दाखवण्यास सांगितले असता प्रवाशांना तिकीट दाखवावे लागेल. असे न केल्यास त्या प्रवाशांवर कारवाई होऊ शकते.
५. कोणालाही दारू, नशापान करून रेल्वे मध्ये प्रवास करणे आणि शिव्या देण्याची परवानगी नाहीये. जर कोणी असे करत असेल तर त्याला रेल्वेतून खाली उतरण्यासोबतच रेल्वे अॅक्ट च्या कलम १४५ नुसार कारवाई होऊ शकते. अशा प्रकरणात ६ महिने जेल आणि दंड केला जाण्याची तरतूद आहे.
६. रेल्वे अॅक्ट चे कलम १४१ नुसार रेल्वे मध्ये फेरी मारणे किंवा भिक मागणे हा गुन्हा गुन्हा आहे. जर कोणी असे करताना आढळल्यास त्याला १ वर्षाची सजा आणि दंडही भरावा लागू शकतो.
७. रेल्वेच्या अधिकृत परवानगीशिवाय कोणालाही तिकीट विकता येऊ शकत नाही. जर कोणी तिकीट विकताना सापडला तर त्याच्या विरोधात रेल्वे अॅक्ट कलम १४२ नुसार कारवाई केली जाऊ शकते. अशा प्रकरणात ३ महिने तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे.
८. रेल्वे वर दगडफेक करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. असा गुन्हा करणाऱ्यास रेल्वे अॅक्ट च्या कलम १५० नुसार १० वर्षांची सजा होऊ शकते.
९. रेल्वे अॅक्ट चे कलम १५१ नुसार रेल्वे मध्ये जाळपोळ करणे किंवा रेल्वेला नुकसान पोचवल्यास ५ वर्षाची सजा होऊ शकते. सोबतच दंडही लागू शकतो.
१०. रेल्वे अॅक्ट नुसार, जर एखादी व्यक्ती एखाद्या संक्रमित आजाराने पीडित असेल आणि त्याला रेल्वे मधून प्रवास करावयाचा असेल. तर त्याला रेल्वेकडून विशेष परवानगी घावी लागेल. जर असा एखादा रुग्ण विना परवानगीने प्रवास करत असेल. तर त्याला रेल्वे मधून खाली उतरवले जाऊ शकते. एवढेच नाही तर अशा रुग्णासोबत प्रवास करण्याऱ्या सह-प्रवाशास सुद्धा रेल्वे मधून खाली उतारले जाऊ शकते. तसेच त्याचे तिकीट जप्त केले जाऊ शकते.
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी