धावण्याव्यतिरिक्त ‘हे’ तीन प्रकारचे व्यायामही ट्रेडमिलवर करता येतात

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ट्रेडमिल ही फक्त धावण्यासाठीच असते असे काहींना वाटते. परंतु, ट्रेडमिलवर अन्य व्यायाम प्रकारही करता येतात. या तीन व्यायाम प्रकारांची माहिती आपण घेणार आहोत. हे व्यायामाचे प्रकार ट्रेडमिलवर सहज करता येतात, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

यातील पाहिला व्यायामचा प्रकार आहे वॉकिंग लंजेस. हा करण्यासाठी ट्रेडमिलचा वेग सामान्य ठेवा आणि त्यावर चाला. चालताना मागचा पाय ९० अंशांच्या अँगलमध्ये ठेवून वाकवा. पायाला वाकवताना ट्रेडमिलला स्पर्श होऊ देऊ नका. याप्रकारेच दुसऱ्या पायाने हा व्यायाम करा. यालाच ट्रेडमिलवर चालताना उठण्याबसण्याचा व्यायामही म्हणू शकता.

दुसरा व्यायाम आहे हिट.  हे हाय इंटेन्सिटी इंटर्व्हेल ट्रेनिंग ट्रेडमिलवर करण्यासाठी ३० सेकंदांपर्यंत जॉगिंग करा. २० मिनिटांपर्यंत सामान्य वेग ठेवून पळा. मग दहा मिनिटांसाठी थांबा. आता एका सेशनमध्ये ५ वेळा पुन्हा करा. ही पद्धत एकाच वेगाने ट्रेडमिलवर वेगाने पळण्यापेक्षा जास्त चांगली असते.

तर तिसरा व्यायाम प्रकार आहे इनक्लाइन पुशअप. हा व्यायाम करण्यासाठी ट्रेडमिलला बंद करा आणि याच्या टॉप हँडलवर हात ठेवा. डोक्यापासून टाचांपर्यंत शरीराला सरळ ठेवा. आता ट्रेडमिलच्या हँडलच्या मदतीने पुशअप्स करा. या दरम्यान ट्रायसेप्सवर लक्ष केंद्रित करून आपल्या कोपराला स्थिर ठेवा. हे तीन व्यायाम केल्याने हाडे मजबूत होतात. स्नायूंना आकार मिळतो. वजन कमी करण्यास मदत होते. त्वचा चमकदार होते. आणि शरीरात लवचिकता वाढते, हे फायदे होतात.

हे व्यायाम प्रकार करतान काही काळजी घेतली पाहिजे. ट्रेडमिलवर वर्कआउट करताना सतत खाली पाहून नका. यामुळे लक्ष विचलित होते. यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. या दरम्यान ट्रेडमिलचे हँडल धरू नका. यामुळे हातामध्ये लचक बसू शकते. ट्रेडमिलचा वेग एकदम वाढवू नका, यामुळे दुखापत होऊ शकते. चालत्या ट्रेडमिलवरून उतरण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तुमचे नियंत्रण बिघडू शकते. तसेच लवकर वजन कमी करण्यासाठी वेग वाढवू नका. यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता असते.