समुद्र किनार्‍यालगत असलेल्या ‘भंगार’ जहाजात युवकाला मिळाला ‘खजिना’, एका झटक्यात झाला ‘मालामाल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्लोरिडामध्ये एक आगळावेगळा प्रकार समोर आला आहे. तेथे दोन युवकांना ३०५ वर्षे जुना खजिना समुद्रकिनारी एका जीर्ण अवस्थेत पडलेल्या जहाजात सापडला. सेंट लूसी येथे राहणाऱ्या ४३ वर्षीय जोना मार्टिनेज यांनी आपल्या मित्रासह एक ऐतिहासिक शोध लावला आहे. त्यांनी इंडियन रिव्हर काउंटीमधील टर्टल ट्रेल बीचवर स्पॅनिश नाण्यांचा खजिना शोधला आहे.

एका वृत्तानुसार, त्या जुन्या जहाजातून निघालेले हे २२ शिक्के ३०५ वर्ष जुने आहेत. ज्यांची किंमत ७,००० डॉलर म्हणजेच ५,१६,१४५ रुपये सांगण्यात येत आहे. जोना मार्टिनेजने स्थानिक वृत्तपत्राला सांगितले की याआधी टर्टल ट्रेल बीच फक्त एक बीच म्हणून ओळखले जात होते, परंतु आता या बीचला खजिना असणारे बीच म्हणून ओळखले जाते.

असे सांगण्यात येते की ३१ जुलै १७१५ ला १२ स्पॅनिश जहाज खजान्यासहित स्पेनला रवाना झाली होती. परंतु फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर तुफान आल्याने ११ जहाज समुद्रात बुडाले होते. आज देखील जहाजांच्या खजिन्याचा मोठा हिस्सा हा समुद्रात बुडाला आहे.

मार्टिनेज यांचे म्हणणे आहे की, ‘मला समुद्र किनाऱ्यावरील बरीच रहस्य माहित आहेत आणि काहीतरी नवीन शोधण्यात मी नेहमी पुढे असतो.’ तसेच पुढे ते म्हणाले की, ‘आमच्या मेटल डिटेक्टरने खूप वेळा मोठमोठ्या वस्तूंचा शोध घेतला आहे. यावेळी देखील आम्हाला १७१५ मध्ये बुडणाऱ्या जहाजात जवळपास २२ स्पॅनिश नाणी सापडली आहेत.

मार्टिनेज यांनी आपल्या २४ वर्षाच्या खजिन्याचा शोध घेण्याच्या कारकिर्दीत याआधी देखील ६.५ मिलियन डॉलरच्या किमतीचे सोने शोधले आहे. त्यांना जगभरात ट्रेजर हंटर म्हणून देखील ओळखले जाते.