पोस्ट कोविड सिंड्रोमवर वेळीच उपचार करा – डॉ. प्रदिप महाजन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पोस्ट कोविड सिंड्रोममध्ये Treat Covid Syndrome कोविड 19 Covid 19 संसर्ग कमी झाल्यानंतर उद्भवू शकणारे अनेक दीर्घकालीन प्रभाव समाविष्ट केले जातात. यामध्ये तीव्र थकवा, श्वास घेण्यात अडचणी, वास न येणे, एकाग्रतेसंबंधी समस्या, चिता आणि नैराश्य, झोपेसंबंधी तसेच पचनासंबंधी समस्या अशा दीर्घकालीन परिणामांमुळे त्यांना त्रास होतो.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पोस्ट कोविडकाळात हृदयाच्या स्नायू आणि रक्तवाहिन्याना सूज येऊ शकते. तसेच रक्तवाहिन्या देखील खराब होऊ शकतात. रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. रक्ताच्या गुठळ्यामुळे मायक्रोथ्रोम्बोसिस होऊ शकतो. संभाव्य परिणामामध्ये स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते.

Pune News | आजचा दिवस हा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने ऐतिहासिक !

डॉ. प्रदिप महाजन Dr. Pradip Mahajan यांनी त्यांच्या केंद्रात पोस्ट-कोविड सिंड्रोम असलेल्या रूग्णांशी सल्लामसलत करून उपचार देखील सुरू केले आहेत.
रुग्णांना पोस्ट कोविड कालावधीत अ‍ॅक्यूपंक्चर, योग, प्राणायाम, फिजिओथेरपी इत्यादी सारख्या सहाय्यक पद्धतींचा आधार घेणे गरजेचे आहे.
कोविडनंतर पुनर्प्राप्ती आणि सामान्य आरोग्याची देखभाल यासाठी फक्त व्हिटॅमिन पूरक आहार आणि औषधांच्या पलीकडे पाहणे महत्वाचे आहे.

जमात-ए-इस्लामी हिंद तर्फे पाथरी येथे वृक्षारोपण

ते स्पष्ट करतात, “कोविड पोस्ट सिंड्रोमच्या उपचारांसाठी Treat Covid Syndrome प्लेटलेट लाइसेटच्या Platelet lysate वापराबद्दल मी विशेष सकारात्मक आहे.
प्लेटलेटच्या घनतेच्या क्लिनिकल फायद्यांची तपासणी अनेक सिस्टमिक आरोग्याच्या स्थितीत केली गेली आहे.
एकाग्रतेमध्ये उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या वाढीचे घटक पेशींच्या स्थलांतरात भूमिका बजावतात, पेशींना अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यास उत्तेजन देतात,
रक्तपुरवठ्यास चालना देतात आणि ऊतकांची दुरूस्ती करतात.
म्हणूनच हे घटक ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास, ऊतींना झालेल्या जखम अशा सर्व लक्षणांचे निराकरण करून निरोगी ऊतीच्या पुनरुत्पादनास मदत करतात.

Coronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 211 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर आकडेवारी

“अर्थात, वैयक्तिक लक्षणांवरही विचार करणे तितकेच महत्वाचे असून त्यानुसार उपचारांचे महत्वाचे आहे. कोणत्याही प्रकारचे दीर्घकालीन लक्षणे कशी टाळता येतील यादृष्टीने प्रयत्न करणे अधिक गरजेचे आहे.
असे डॉ. महाजन सांगतात.पोस्ट-कोविड सिंड्रोम हा व्हायरसप्रमाणेच नवीन आहे म्हणूनच त्यानुसार उपचार करणे अधिक गरजेचे आहे.
डॉ. प्रदिप महाजन, रिजनरेटिव्ह मेडिकल रिसर्चर, डॉ. महाजन हॉस्पिटल मुंबई

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Treat Covid Syndrome on Time Dr Pradip Mahajan

हे देखील वाचा

Covid Health Insurance Policy | कोरोना हेल्थ इन्शुरन्स घेत आहात तर वेटिंग पीरियडसह ‘या’ 10 गोष्टींकडे ठेवा लक्ष, जाणून घ्या