मोदींच्या सभेत मोठ्या घातपाताची धमकी

लखनऊ वृत्तसंस्था – कानपूर-कालिंदी एक्सप्रेसमध्ये बुधवारी झालेल्या कमी स्फोटाचा तपास करताना एक धक्कादायक पत्र पोलिसांना मिळाले आहे. मोदींच्या सभेत मोठा स्फोट घडवून घातपात करण्याची धमकी या पत्रात दिली आहे. या पत्राची विश्वासार्हता तपासण्याचे काम सुरु आहे.

कामपूर – कालिंदी एक्सप्रेसमध्ये बुधवारी कमी शक्तीचा स्फोट झाला. त्यावेळी तपास करत असताना रेल्वेमध्ये पोलिसांना हे पत्र सापडले. जैश-ए- मोहम्मदच्या निनावी हस्तकाच्या नावे अशलेले हे पत्र हिंदी भाषेत लिहीलेले आहे. ते हस्तलिखित असून त्यात पंतप्रधान मोदींच्या आगामी सभेखेरीज शताब्दी एक्सप्रेसमध्येही स्फोट घडवून आणण्याची योजना असल्याचे म्हटले आहे. ही कामगिरी फत्ते करण्यासाठी पाच कोटी रुपयांचे बक्षिस मिळणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. पत्राच्या शेवटी जैश चा एजंट एवढाच उल्लेख आहे. परंतु हे पत्र नेमके कोणाला उद्देशून लिहिले आहे. हे स्पष्ट होऊ शकले नाही. तर पंतप्रधानांच्या नेमक्या कोणत्या सभेत स्फोट करण्याचे ठरले आहे. याची पत्रात उल्लेख नाही. तसेच पत्राचा खरेपणा तपासण्याचे काम यंत्रणा करत आहेत.