काय सांगता ! होय, एवढा निष्काळजीपणा, ‘कोरोना’बाधिताला उपचारासाठी पाठवलं HIV चं किट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या तपासणी व उपचारासाठी पाठविलेल्या किटमध्ये दुलर्क्ष केल्याचे समोर आले आहे. हल्द्वानी एसटीएच आणि चंपावत यांच्यासह कुमाऊच्या रूग्णालयात पीपीई किट्सच्या जागी एचआयव्ही किट पाठविण्यात आल्या आहेत. चार दिवसांपूर्वी अशा किट बर्‍याच रुग्णालयात पाठवल्या गेल्या आहेत.

आरोग्य विभागाने कुमाऊमध्ये पीपीईऐवजी एचआयव्ही रूग्णाच्या चाचणीसाठी वापरले जाणारे किट्स पाठवले आहेत. कुमाऊचे सर्वात मोठे रुग्णालय एसटीएचसह फील्ड कामगारांना एचआयव्ही किटदेखील देण्यात आल्या, परंतु आता त्याचा वापर बंद करण्यात आला आहे. त्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला होता की, जिल्ह्यात 100 पीपीई किट पुरविण्यात आल्या आहेत. परंतु आता असे म्हटले जात आहे की, पीपीई किटऐवजी एचआयव्ही किट शासन स्तरावरून पुरविण्यात आल्या आहेत. चार दिवसांपुर्वी या किट व्यतिरिक्त 100 ट्रिपल लेयर मास्क, 100 व्हीटीएम पाठविण्यात आले आहेत.

चंपावत सीएमओ यांचे म्हणणे आहे की, चंपावत जिल्ह्यात 100 एचआयव्ही वितरण किट्स प्राप्त झाले आहेत. लवकरच येथे पीपीई किट पुरवल्या जातील. पीपीईमध्ये एक गाऊन, कॅप, फेस मास्क, प्रोटेक्टिव आई केअर, हातमोजे आणि शू कव्हर सामिल आहे.

दोन किट मध्ये फरक
वास्तविक एचआयव्ही किटमध्ये चेहरा झाकण्यासाठी चष्मा असतो परंतु तो चेहरा झाकण्याचा भाग नसतो. यामुळे शरीराचा काही भाग मोकळा राहतो. पीपीई किट संपूर्ण शरीराला झाकुन टाकते, जेणेकरून विषाणू आरोग्य कर्मचार्‍यांच्या शरीराच्या कोणत्याही भागाच्या थेट संपर्कात येऊ नये.