मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दादरमधील जुना महापौर बंगला आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक असलेल्या परिसरात आज दुपारी एक झाड अचानक कोसळले. त्यामुळे महापौरांच्या बंगल्याची भिंत देखील कोसळी. यात कोणालाही कोणतीही दुखापत झाली नसल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.
महापौर बंगल्यातील केळुस्कर रोडलगत असलेल्या भिंतीला लागून असलेले ६५ फूट उंच गुलमोहराचे झाड दुपारी 2 च्या सुमारात अचानक कोसळले. या परिसरात वर्दळ नसल्याने सुदैवाने कोणतीही गंभीर परिस्थिती निर्माण झाली नाही. असे असले तरी महापौर बंगल्याची भिंत कोसळली आहे. या भिंती लगत उभ्या असलेल्या एका कारवर कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले.
या घटनेनंतर पलिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना घटनास्थळी धाव घेतली. या झाडाखाली अडकलेली कार काढण्याचे आणि मातीचा ढिगारा हटवण्याचे काम पालिकेने सुरु केले आहे. तसेच स्मारकाच्या आवारातील इतर धोकादायक झाडांची पाहणी करणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईत काल पासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे अनेक रस्ते देखील बंद करण्यात आले आहे. तसेच मुंबई वेधशाळेने मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, मुंबईत अतिवृष्टी होऊ शकते.
- आरोग्यविषयक वृत्त –
पाणी किती प्यावे, याबाबतचे समज आणि गैरसमज, काय सांगते आयुर्वेद - टॉनिक प्रमाणे काम करते ‘काजूची पावडर’ ,रोज खाल्ल्याने दूर होतात १० अडचणी
- सुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे ‘संतुलित आहार’
- ‘या’ बीया दूधातून घ्या ; थकवा, कमजोरी दूर करा, उर्जा प्राप्त करा, जाणून घ्या
- दूर होईल ‘श्वेत प्रदर’ची समस्या, करा ‘या’ ६ पैकी कोणताही १ उपाय, जाणून घ्या
- पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- नोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे
- गर्भवती महिलांसह ‘या’ ८ लोकांना डास अधिक चावतात, ‘ही’ आहेत कारणे
- ‘हे’ आहे प्रियंका, अनुष्का, करिना, ऐश्वर्या आणि सोनाक्षीच्या सौंदर्याचे गुपित !
- ‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय