पुणे वानवडी भागात धावत्या ऑटोरिक्षावर पिंपळाचे झाड कोसळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वानवडी भागात धावत्या ऑटोरिक्षावर झाड कोसळले. या घटनेत रिक्षाचालकासह गर्भवती महिला प्रवासी आणि तिचा लहान मुलगा असे तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. सोमवारी दुपारी होले वस्तीजवळ हा प्रकार घडला.

फातिमानगर वानवडी रस्त्यावर सोमवार दिनांक ८ जुलै २०१९ रोजी दुपारी ४:१५ वा. सुमारास होले वस्तीयेथील बँक ऑफ महाराष्ट्र चौकातील कॉटन किंग दुकानासमोरील धावत्या ऑटोरिक्षावर पिंपळाचे झाड कोसळले.अचानक झाड पडल्याने गोंधळ उडाला. ऑटोतील प्रवासी जखमी झाल्याचे पाहून परिसरातील लोक त्यांच्या मदतीला धावले. यावेळी रिक्षाचालकासह महिला आणि तिच्या लहान मुलास बाहेर काढून नागरिकांनी त्यांना जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. जखमी महिला ही गर्भवती असल्याची माहिती नागरिकांनी दिली. दरम्यान, रहदारीच्या रस्त्यामध्ये झाड कोसळल्याने सुमारे एक तास वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. झाड पडल्यानंतर काही वेळातच कोंढवा खुर्द अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी पोहचले. केंद्रप्रमुख अनिल गायकवाड, तांडेल दिलीप बिबवे, सुभाष खाडे, सागर दळवी, धर्मराज माने, चालक सचिन चव्हाण आदींनी झाड कापून बाजूला घेत वाहतुकीसाठी रस्ता खुला करून दिला.

दरम्यान, शहरात सततच्या पावसामुळे झाडपडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सोमवारी पुन्हा 15 ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने दिली.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ