घरावर झाड कोसळल्याने आईसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – मुसळधार पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावर लिंबाचे झाड कोसळल्याने आईसह दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथे घडली. घरावर कोसळलेले झाड क्रेनच्या सहाय्याने बाजूला केल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले.

शारदा गुणवंत हिरडकर (वय-२८) सृष्टी (वय-३) आणि ऋषिकेश (वय-२) असे मृत्यू झालेल्याची नावे आहेत. गुणवंत हिरडकर हे हॉटेल व्यावसायिक असल्याने ते कामावर गेले होते. त्यामुळे या घटनेत त्यांचा जीव वाचला.

वादळी वाऱ्यामुळे घरावर मोठे लिंबाचे झाड कोसळले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घराकडे धाव घेतली. झाड मोठे असल्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी मोठी क्रेन आणून झाड बाजूला करण्यात आले. नागरिकांनी तात्काळ तिघांना सामान्य रुग्णालायात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.

आरोग्य विषयक वृत्त – 

मुतखड्याच्या असह्य वेदना टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी

थायरॉइडने त्रस्त आहात ? घरगुती उपाय करून समस्या सोडवा

हॉटेलमधील “फिंगर बाऊलमध्ये” हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

You might also like