‘आरे’मधील झाडांच्या कत्तलीप्रकरणी चौकशी समिती स्थापन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील झाडांच्या कत्तलीची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. अर्थ विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये हे आदेश देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशी करण्यासाठी आज एक समिती स्थापन केली. आरेमध्ये कारशेड उभारण्यासाठी 2100 झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्याची चौकशी ही समिती करणार आहे.

कत्तल करण्यात आलेल्या झाडे कोणाच्या आदेशावरून तोडण्यात आली, एवढी झाडे तोडण्याची गरज होती का, कारशेडसाठी आरेऐवजी दुसरा पर्याय शोधता आला नसता का, रात्रीच्यावेळीच झाडे का तोडली आदी प्रश्नांचा उलगडा ही समिती करणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. येत्या 15 दिवसांत समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Visit : policenama.com

Loading...
You might also like