लक्ष्मीनगरमधील पोलीस चौकीवर झाड कोसळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
सहकारनगर २ मधील लक्ष्मीनगर पोलिस चौकीवरच झाड कोसळण्याची घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
लक्ष्मीनगर पोलीस चौकीजवळ असणारे एक जुने झाड आज सकाळी चौकीवर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच अग्नीशन दलाचे ८ जवान घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, उद्यान विभागाचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. उद्यान विभाग आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी झाच्या फांद्या कापून झाड हटवले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर कोसळलेले झाड हटवण्यास यश आले.
या घटनेत कोणतीही जखमी झाले नाही. तसेच मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याचे अग्नीशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d38769c2-c645-11e8-9c81-0f5e4184a2c3′]
चोरट्यांनी तीन लाखांची रोकड पळवली
गाडीच्या हँडलला अडकवलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. या बॅगेमध्ये ३ लाख २०० रुपयांची रोकड होती. ही घटना अरणेश्वर येथे घडली आहे. फिर्यादी हे रक्कम असलेली सॅक गाडीच्या हँडलला अडकवून भाजीची पिशवी आणण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी हँडलला अडकवलेली बॅग चोरट्यांनी पळवून नेली. फिर्यादी हे भाजीची पिशवी घेऊन आले असता त्यांना गाडीला अडकवलेली बॅग दिसली नसल्याने हा प्रकार उघडकीस आला. सहकारनगर पोलीस ठाण्याचे महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरताली सीसीटीव्ही तपसले. मात्र, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांना तपासात अडथळे येत आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.
जाहिरात