अभिनव उपक्रमातून जी डी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी कडून तब्बल 100 झाडांची लागवड

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – जायकवाडी परिसरातील गोदावरी दुधना इंग्लिश स्कूल, पाथरी नेहमी काहीतरी वेगळे करण्यास प्रसिद्ध आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक वेगळा उपक्रम “मेरे जन्म दिन का एक निशाण, मेरा पेड मेरी पेहचान”
GD School
वाढदिवसानिमित्त केक न कापता विद्यार्थ्यांच्या उंचीप्रमाणे झाडे लाऊन वाढदिवस साजरा करावे, असे जी डी स्कूलचे संचालक शेख सलिम यांनी विद्यार्थ्यांना सूचित केले. नंतर या उपक्रमाला शाळेतील विद्यार्थी व पालकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला व बघता बघताच अल्पकाळातच तब्बल शंभर झाडांची लागवड या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली, या उपक्रमाने शाळेचे सौंदर्य दुपटीने वाढले असून निसर्गालाही या वाढत्या वृक्षाची साथ भविष्यात नक्की मिळेल असे दिसून येत आहे.

या वृक्षांची काळजी करता शाळेने ठिबकद्वारे पाणी पुरवठा खत व जन्मभूमी फौंडेशनकडून मिळालेली ट्री गार्ड लावून झाडांचे संरक्षण केले आहे. या उपक्रमाचं कौतुक तालुकास्तरावर नाहीतर जिल्हास्तरावरही होत आहे असे शाळेचे संचालक शेख सलिम यांनी सांगितले.

Visit : Policenama.com