लोणी काळभोर : पोलिसनामा ऑनलाइ (शरद पुजारी) – थोर मराठा साम्राजाचा शिलेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त तिर्थक्षेत्र रामदरा परिसरातील केसकरवस्ती येथे सुमारे शंभर देशी झाडांची लागवड करुन एक आगळीवेगळी आदरांजली एका देशभक्ताला वाहून ग्रीन फाऊंडेशनने वेगळेपण दाखवून दिले.
“स्वच्छ, सुंदर व हरित महाराष्ट्र” ही संकल्पना ग्रीन फाउंडेशन कडून राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने हवेली तालुक्यात विविध ठिकाणी पर्यावरण पुरक कार्यक्रम हाती घेतले जात असून ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण करण्यात येत आहे. तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त लोणी काळभोर तिर्थक्षेत्र रामदरा केसकर वस्ती येथील परिसारामध्ये फाउंडेशन च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. या वृक्षारोपणाचा शुभारंभ सुभाष विरकर यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, शिवरूद्र प्रतिष्ठानचे अविनाश काळभोर, महेश काळभोर,प्रशांत काळभोर, तुषार काळभोर, सनी काळभोर, दिगंबर जोगदंड, प्रसाद काळभोर, सचिन काळभोर, किरण मगर, कृष्णा देठे, जयेश पवार, निखील महाजन, अभिषेक शेंडगे, गणेश कांबळे, सागर वलठे, तसेच श्रीमंत अंबरनाथ तरूण मंडळ, शिवरूद्र प्रतिष्ठान, क्रांतीविर मित्र मंडळ. यांचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. केसकर वस्ती येथे फाउंडेशनच्या वतीने शंभर झाडे लावण्यात आली.
या फाऊंडेशनच्या वतीने केवळ झाडे लावली जात नाहीत तर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी सुध्दा घेतली जाते. सध्या अशा सेवाभावी संस्थांची नितांत आवश्यकता आहे कारण सगळीकडे फक्त दिखावा करण्यात धन्यता मानली जाते परंतु ग्रीन फाऊंडेशन मधील तरुणांचा आदर्श जर इतरांनी घेतला तर मोठी हरीत क्रांती घडू शकते.