प्रसिद्ध ट्रेकर अरुण सावंत यांचा दुर्दैवी मृत्यू, हरीचंद्र गडाच्या कोकण कड्यावरील घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध ट्रेकर अरुण सावंत (वय 63, रा. मुंबई) यांचे दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरीचंद्र गड येथील कोकण कड्यावर ही घटना घडली आहे.

अरुण सावंत हे मूळचे मुंबई येथील आहेत. राज्यभरात अरुण सावंत हे रॉक रॅपलिंग म्हणून प्रसिद्ध होते. हरीचंद्र गडावर काही इव्हेंटसाठी ते गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. येथील कोकण कड्यावर त्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील काही ट्रेकर त्याठिकाणी गेले आहेत. नेमकी घटना कशी घडली याची माहिती कळू शकलेली नाही. मात्र, याघटनेमुळे ट्रेकरमध्ये खळबळ उडाली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like