‘या’ गडावर ट्रेकिंगला गेलेले २० ट्रेकर्स ८०० फूट खाली अडकले

ठाणे : पोलीसनामा आॅनलाइन – कल्याणचे २० ट्रेकर्स हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंगसाठी गेले होते. तेथे ते कोकणकडापासून ८०० फूट खाली फसले आहेत. अंधार झाल्याने या ठिकाणी रात्री बचाव कार्य थांबवण्यात आले होते. यामुळे ट्रेकर्सना रात्र तिथेच काढावी लागली. कल्याणचे डॉ. हितेश अडवाणी हे २० जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंग साठी गेले होते. मात्र, हरिश्चंद्रगड येथून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकणकडा येथे हे सर्व ट्रेकर अडकले आहेत.

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी डॉ. अडवाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्यासोबत ५ महिला आणि १७ पुरुष असल्याची माहिती मिळाली. सर्वजण कोकणकडापासून ८०० फूट खाली असल्याने त्यांना मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे बचाव पथकाला त्यांचे नेमके ठिकाण शोधताना अडचण येत आहे. जिल्हा प्रशासनाने ठाण्याहूनही काही ट्रेकर्सना मदतीसाठी बोलावले आहे. तसेच, एनडीआरएफच्या मदतीचे प्रयत्नही सुरू आहेत. अंधार पडल्याने या ट्रेकर्सना रात्र तिथेच काढावी लागली. जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे ग्रामीण पोलीस तसेच जुन्नर पोलीस यांना देखील या घटनेविषयी कळविले असून तहसीलदार अमित सानप या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. मुरबाड तहसीलदार आणि त्यांचे कर्मचारी देखील बचावासाठी प्रयत्न करीत होते.

ब्राह्मण समाजाची राज्यस्तरीय समन्वय समिती
पुणे :  ब्राम्हण समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी ब्राम्हण संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पुण्यात झाली. याबैठकीत समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. ब्राम्हण समाजाच्या विविध मागण्या गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. या मागण्या सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मान्य कराव्यात, अशी मागणी समाजाच्या प्रतिनिधींच्यावतीने करण्यात आली.

समाजाने स्थापन केलेल्या राज्य समन्वय समितीच्या माध्यमातून लवकरच मोठे आंदोलन करण्यात येणार, अशी माहिती यावेळी देण्यात आली. समाजातील आर्थिक मागास घटकातील तरुणांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे, ब्राम्हण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह उभारणे, ब्राम्हण समाजावर होणारे चिखलफेक थांबवण्यासाठी कायदा करणे, दादोजी कोंडदेव आणि राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची पुन:स्थापना करणे, शनिवार वाडा येथे पेशवे सृष्टी निर्माण करणे इत्यादी मागण्यांचा ब्राम्हण समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये समावेश आहे.

साताऱ्यात अजंठा हॉटेलवर छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश