दिल्लीत भूकंपाचे ‘झटके’, उत्तराखंड आणि UP मध्ये देखील जाणवलं, 5.0 रिश्टर स्केलची ‘तीव्रता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील मोठ्या भागात भूकंपाचे हादरे बसले आहेत. दिल्ली एनसीआर तसेच, लखनऊ, चंदीगढ, नोएडा, गुरुग्राम सहित उत्तर भारतातीतल अनेक शहरात भूकंपाचे हादरे बसले आहेत. सदर भूकंपाचे हादरे किती तीव्रतेचे आहेत याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचं केंद्र भारत-नेपाळ सीमेच्या जवळ असणाऱ्या एका ठिकाणाचं आहे. असे असले तरी उत्तर प्रदेशातील अनेक भागात भूकंपाची तीव्रता अधिक असल्याचं समोर आलं आहे.

अशी माहिती मिळाली आहे की, दिल्ली एनसीआर सहित इतर भागात बसलेले हे भूकंपाचे हादरे सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास जाणवले आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. परंतु उत्तर प्रदेशातील अनेक भागात याची तीव्रता जाणवली आहे.

दिल्लीत भूकंपाचे झटके झाले असले तरी ते उत्तराखंड आणि युपीमध्ये देखील जाणवले. भूकंपाची तीव्रता 5.0 रिश्टर स्केल एवढी होती.

Visit : Policenama.com