Trending News | तुम्ही पाहिलाय का असा पोपट जो स्वत: उघतो डस्टबिनचे झाकण? वायरल व्हिडिओमध्ये पाहा हैराण करणारे दृश्य (Video)

नवी दिल्ली : मनुष्य नेहमी आपल्या घरातील कचरा डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी त्याचे झाकण उघडतो. परंतु विचार करा जर तुम्हाला कुणी सांगितले की काही पक्षीसुद्धा डस्टबिनचे झाकण सहजपणे उघडू शकतात, तर उघड आहे की तुम्ही हैराण व्हाल (Trending News). परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने वायरल होत आहे. ज्यामध्ये एक पक्षी (Cockatoos) कुणाच्या मदतीशिवाय स्वत:च डस्टबिनचे झाकण उघडताना दिसत (Trending News) आहे.

मॅक्स प्लँक इन्स्टीट्यूट ऑफ अ‍ॅनिमल बिहेवियरद्वारे ऑनलाइन शेयर करण्यात आलेल्या एका नवीन व्हिडिओवरून समजते की, Cockatoos काही इतर कामे करण्यास सक्षम आहेत. जर्मनीत मॅक्स प्लँक इन्स्टीट्यूट ऑफ अ‍ॅनिमल बिहेवियरच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून समजले आहे की, Cockatoos स्वत:च डस्टबिनचे झाकण उघउू शकतात. त्यांनी Cockatoos चा व्हिडिओसुद्धा शेयर केला आहे.

संस्थेच्या शास्त्रज्ञांनी सल्फर-क्रेस्टेडने Cockatoos ची वर्तणूक आणि खाण्याच्या शोधासाठी डब्बे
खोलण्याची पद्धत शिकण्याच्या त्यांच्या क्षमतेचा अभ्यास करण्यात मदत केली. हा रिसर्च तेव्हा सुरू
झाला जेव्हा पक्षी शास्त्रज्ञ रिचर्ड मेजर यांनी पाहिले की, एक Cockatoos कचर्‍याचे झाकण
शोधण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहे. नंतर जेव्हा शोध सुरू झाला तेव्हा आढळले की, सिडनीत तीन ठिकाणी असे Cockatoos होते जे डब्बे खोलू शकत होते. एक वर्षाच्या जास्त कालावधीनंतर, या ठिकाणांची संख्या वाढून 44 झाली.

या पक्षांवर रिसर्च करणार्‍या टीमने म्हटले की, पक्षांमध्ये खाण्याचा शोध घेताना एकमेकांकडून
कौशल्य शिकण्याची प्रवृत्ती आहे. आता सायन्स जर्नलमध्ये याबाबत एक सविस्तर अभ्यास अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, काही जीवांमध्ये वेगाने बदलणार्‍या
पर्यावरणाला अनुकूल होण्याची क्षमता आहे. असेच काही प्राणी फूड ट्रॅकिंग आणि रिट्रीव्हलसाठी
स्वत:च नवीन पद्धती शिकतात.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत तेजी, विक्रमी स्तरापेक्षा 8576 रुपये ‘स्वस्त’

BS Yediyurappa | कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचा राजीनामा, आजच पुर्ण झालेत सरकारचे 2 वर्ष

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Trending News | clever cockatoos have taught themselves how to open bins see this viral video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update