जिल्हा कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे जिल्हा कारागृहात एका कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये कैदी जखमी झाला आहे. भारत बुधा कोळी असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. कोळी याला बालअत्याचाराच्या गुन्ह्यात शिक्षा झाली आहे.

त्याला जिल्हा कारागृहातील बॅरेक चारमध्ये ठेवण्यात आले आहे. याच ठिकाणी त्याने सोमवारी (दि.१३) सायंकाळी सहाच्या सुमारास बॅरेगच्या लोखंडी गजावार डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला.भारत बुधा कोळी हा १२ मे पासून जिल्हा कारागृहात आहे. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्याने आरडाओरडा करून मला जीव देयचा आहे असे म्हणत त्याने बॅरेगच्या लोखंडी गजावर डोके आपटण्यास सुरुवात केली.

त्यावेळी बॅरेगमध्ये असलेल्या इतर कैद्यांनी आणि पोलिसांनी त्याला बाहेर काढले. त्याच्या डोक्यास जखम झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.पोलिसांनी कोळी याच्यावर प्रथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय धुळे येथे कारागृह रक्षकांच्या पथकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी बापु मोतीराम निकम यांनी फिर्याद दिली आहे.

Loading...
You might also like