‘पानी फाऊंडेशन’ साठी श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांवर आदिवासींच्या जमावाचा हल्ला

मनमाड : पोलीसनामा ऑनलाईन – दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या वतीने ग्रामस्थांच्या मदतीने श्रमदान करण्यात येते. ही श्रमदानाची कामं पाऊस सुरु होण्यापूर्वी करण्यात येतात. नाशिक येथील चांदवड तालुक्यात पानी फाऊंडेशन च्या वतीने श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांवर आदिवासी समाजाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून जमावाने ५ ते ६ मोटारसायकल जाळण्याचा देखील प्रयत्न केला असल्याची माहिती मिळते आहे.

याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत चांदवड तालुक्यातील 72 गावांनी भाग घेतला आहे. त्यानुसार आज मतेवाडीमधील गावकऱ्यांनी डोंगरउतारावर चर खोदण्याच काम सुरु केले .मात्र यावेळी तेथील वनजमीन असणाऱ्या आदिवासींच्या जमावाने अचानक ग्रामस्थांवर हल्ला केला. आदिवासींनी काठ्या आणि दगडांनी गावकऱ्यांवर हल्ला केला. यात चार गावकरी जखमी झाले तर त्यांच्या सात मोटरसायकल जाळण्याचा प्रयत्न केला. एव्हढेच नाही तर यावेळी पोकलंडच्या काचाही फोडल्या. आदिवासींच्या जमावाने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्याना उपचारासाठी चांदवड येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं परंतु आदिवासींनी हल्ला का केला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like