केवळ मतांसाठी धनगर समाजाला ‘एसटी’ कोट्यातून आरक्षण देण्याचा घाट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गात समाविष्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न संविधानाविरोधी असून निवडणुकीत धनगर समाजाची केवळ मते मिळावीत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा घाट घातला आहे असा आरोप आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच या निर्णायविरोधात आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या वतीने आज शनिवार(दि 9 मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार नदर्शने करण्यात आली.

धनगर समाजाचा आदिवासींच्या यादीत समावेश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. आदिवासांच्या यादीत 36 व्या क्रमांकावर असणारी ओरान धांगड ही जमात म्हणजे महाराष्ट्रातील धनगर समाज आहे असे सांगणारे प्रतिज्ञापत्र 12 मार्चला उच्च न्यायालयात सादर करणार आहेत. आदिवासी समाजावर अन्याय करणारे असे हे प्रतिज्ञापत्र आहे.

दरम्यान आदिवासी हक्क संरक्षण समितीचे सदस्य डाॅ. संजय दाभाडे म्हणाले की, “2014 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देऊ असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्या आश्‍वासनाची पूर्तता करण्याची मागणी धनगर समाजाकडून केली जात आहे. आदिवासींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे शासन सांगत आहे. मात्र, हे सर्व खोटे आहे.” असा आरोप संजय दाभाडे यांनी केला आहे.

सरकारने धनगर समाजाच्या मतांवर डोळा ठेवला असून धनगर समाजाचा अभ्यास करण्यासाठी सरकारने टाटा संशोधन संस्थेला(TISS) निवडले होते. दरम्यान टीआयएसएसने हा अहवाल सरकारला सादर केला असून तो सरकारने लपवला आहे असा आरोप आदिवासींनी केला आहे. तर धनगर समाज हा आदिवासी नसल्याचे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (टीआरटीआय) सांगितले आहे. विशेष म्हणजे ही संस्था शासनाचीच आहे.

दरम्यान ओरान धांगड ही जमात म्हणजे महाराष्ट्रातील धनगर असे सांगणारे प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री न्यायालयात सादर करणार आहेत. इतकेच नाही तर, तसा प्रस्ताव राज्याकडून केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे, तो करू नये, यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी हक्क संरक्षण समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.

ह्याहि बातम्या वाचा –

Air Strike : ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप बालाकोटमध्ये पडून

पाकची ढवळाढवळ संपेना ! भारताच्या हद्दीत पुन्हा ड्रोन

एअर स्ट्राईकचे पुरावे जनतेसमोर राष्ट्रहितासाठी मांडले जावेत

मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त मुंबईतील ५०,००० पोलिस कर्मचार्‍यांना मिठाई