आदिवासी महिलांनी केले दारु धंदे उध्दवस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दारु पिऊन आदिवासी मुलींची छेडछाड करीत असल्याने संतप्त झालेल्या आदिवासी महिलांनी खेड तालुक्यातील ठाकरवाडी परिसरात सुरु असलेले गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्त केले. या महिलांनी दारूच्या अड्ड्यांवरील सर्व साहित्यांची तोडफोड केली. दारुचे प्लॅस्टिकचे छोटे ड्रम फोडून टाकले. त्यातील दारू ओतून देऊन दारु विक्री करणाऱ्यांना मारहाण करुन पिटाळून लावले.

दावडी, ठाकरवाडी परिसरात पोलिसांच्या आशिर्वादाने अनेक गावठी दारुचे अड्डे रस्त्याच्याच कडेला सुरु होते. ही गावठी दारु प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून दिली जात होती. त्यामुळे सर्वत्र प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा खच पडत असे. ठाकरवाडीतील अनेकांच्या शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी या जनावरांना रानात चरायला सोडल्यावर जनावरे या प्लॅस्टिक पिशव्या खात होते. ठाकरवाडी येथील पुरुषही येथून दारू घेऊन जात होते. त्यातून वाड्यावस्तीवरील घरात भांडणे होत होती. या महिलांनी अनेकदा येथील दारु अड्डे बंद करण्याची समज दिली होती. पोलिसांकडेही तक्रारी केल्या होत्या. पण, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. येथे येणारे मद्यपी वाड्या वस्तीतील महिला, मुलींना त्रास देत असत.

शनिवारीही असाच प्रकार घडला. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी दुर्गावतार धारण करीत दारु विक्रेत्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. काही आदिवासी महिलांनी या अड्ड्यावरील सर्व साहित्यांची मोडतोड केली. प्लॅस्टिकचे कॅन फोडून टाकले. त्यातील दारु ओतून टाकली.

तेव्हा दारू विक्रेते तेथे आले. ते महिलांना दमदाटी करुन लागले. तेव्हा महिलांनी त्यांनाही चोप देऊन पिटाळून लावले. जर हे दारु अड्डे पुन्हा सुरु झाले तर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

You might also like