पुलवामा हल्यातील जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन दि.१४ फेब्रुवारी २०१९ ला भारतातील जम्मु आणि कश्मीरचा पुलवामा जिल्हयातील जम्मु आणि श्रीनगर या राष्ट्रीय महामार्गावरील लेथापोरा, या अवंतीपोराजवळ असलेल्या
ठिकाणी केंद्रीय रिझर्व्ह पोलिस फोर्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलाच्या वाहनांचा एका ताफ्यावर दुपारी सुमारे ३.१५ मिटांनी पाक पुरस्कृत एका आमघातकी आंतकवाद्याने आपल्या वाहना सकट हल्ला केला. या वाहनात स्फोटके भरलेली होती. ताफ्यातील केंद्रीय राखीव बलातील ४० जवानांचा घटनास्थळीच शहीद झाले.

हया काफिल्यात सुमारे ७८ वाहने व सुमारे २५०० पेक्षा जास्त जवान होते. ताफा आपल्या मुक्कामावर
सुर्यास्तापूर्वी पोहचणे अपेक्षित होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित इस्लालिक गट जैश ए महंमदने स्विकारली होती. या घटनेला आज एक वर्ष पुर्ण झाले. भारत मातेचा सेवेत असलेले सर्व शहिद झालेल्या जवानांना आज धुळे महानगरात महाराणा प्रतापजी यांच्या स्मारकाजवळ श्रध्दांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह राजेशजी पाटील शहर कार्यवाह संजयरी पाटील सुरेंद्र काकडे, शेखर मराठे, गुलाब माळी, सिध्देशवरजी संदिप चौधरी, ईश्वर पवार, रोहीत विभाडी, योगेश भगत, कोमल नाबारे आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.