Trick For Weight Loss | Lockdown मध्ये वाढेलेले वजन कमी करायचंय तर ऑफिसमध्ये काम करताना वापरा ‘या’ ट्रिक्स; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मागिल दोन वर्ष आपल्याला सर्वांना कोरोनासारख्या (Corona) महाभयंकर विषाणूला सामोरं जावं लागलं. त्याकाळात शाळा, ऑफिसही बंद ठेवण्यात आले होते. याचाच परिणाम म्हणून ऑफिसमधल्या काही कर्मचाऱ्यांना आपल्या घरातूनच काम करवं लागलं. या दिवसांमध्ये बऱ्याच जणांचं रूटिनही (Routine) बिघडलं त्यामुळे अनेकांना आपल्या शरीराकडे लक्ष देण्यासाठीही वेळ नसायचा. (Trick For Weight Loss) या दिवसांमध्ये काहींना मानसिक त्रास (Mental Distress) होऊ लागला, तर काहींचं वजन देखील वाढू लागलं. परंतू आता ऑफिस पूर्वीसारखी सुरळीत सुरू झाली आहे. (Trick For Weight Loss)

 

वजन वाढलेल्या महिला, पुरूष आपलं वजन कमी करण्यासाठी आता मात्र खूप मेहनत घेत आहेत. तर आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात काही ट्रिक्स सांगणार आहे. ज्या तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काम करता-करता करू शकता. (Trick For Weight Loss)

 

1. दर अर्ध्या तासाने डेस्कवरून उठणे (Getting Up From The desk Every Half Hour) :
वाढत्या वजनामुळे तुम्हाला त्रास होत असेल, तर ऑफिसमध्ये तासनतास स्क्रिनसमोर काम करू नका. दर अर्ध्या तासाने स्क्रिनसमोरून उठून फेरफटका मारा. अर्ध्या तासानंतर जर तुम्ही स्क्रिनसमोरून डोळे काढले तर तुमच्या डोळ्यांनाही विश्रांती (Rest) मिळेल आणि कंबरंही चांगली राहिलं.

 

2. जोरात श्वास घ्या आणि सोडा: (Inhale And Exhale)
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर जोरात श्वास घ्या आणि सोडा. जोरात श्वास घेतल्याने आणि सोडल्याने ब्लड सर्कुलेशन (Blood Circulation) सुरळीत होईल आणि लठ्ठपणाही कमी होईल.

3. स्ट्रेचिंग व्यायाम करा: (Stretching Exercises)
वजन कमी करायचे असेल तर ऑफिसमध्ये दर अर्ध्या तासानंतर खुर्चीवरून उठून स्ट्रेचिंग व्यायाम (Stretching Exercise) करा. स्ट्रेचिंग एक्सरसाइज म्हणजे तुम्ही खुर्चीवरून उठून शरीराच्या हालचाली कर त्यामुळे तुमचे वजन काही दिवसांतच कमी होईल.

 

4. चहा-कॉफीचे सेवन कमी करा: (Tea And Coffee)
जर तुम्ही ऑफिसमध्ये बराच वेळ डेस्कवर बसून काम करत असाल, तर थकवा दूर करण्यासाठी चहा-कॉफीचे (Tea-Coffee) सेवन करू नका.
चहा आणि कॉफीच्या अतिसेवनाने तुमचे वजन वाढू शकते. चहा कॉफीऐवजी तुम्ही हेल्दी डिटॉक्स ड्रिंकचे सेवन करा.
त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासही फायदा होऊ शकतो.

 

5. जेवणामध्ये हेल्दी फूडचा समावेश करा: (Healthy Food)
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर जेवणामध्ये हेल्दी फूडचा समावेश करा.
तेलकट आणि जंक फूड टाळा (Avoid Oily And Junk Food).
ऑफिसमध्ये जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील चरबी (Fats) झपाट्याने वाढू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Trick For Weight Loss | if you want to control weight so do these 5 work at office

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Alsi For Diabetes | ‘या’ पदार्थाचे सेवन केले तर Blood Sugar येईल कंट्रोलमध्ये; जाणून घ्या

 

Diabetes | मधुमेहींची शुगर कंट्रोल करते ‘हे’ एक Vitamin, जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

 

Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यात परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा, जाणून घ्या