आरोग्यताज्या बातम्या

Tricks To Reduce Belly Fat | पोटाच्या वाढत्या चरबीमुळे अस्वस्थ, म्हणून ट्राय करा ‘या’ 5 ट्रिक्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tricks To Reduce Belly Fat | पोटावर जमा झालेल्या चरबीमुळे अनेक जण त्रस्त असतात आणि पोटातील चरबीमुळे हृदयरोग, कर्करोगासारखे (Heart Disease, Cancer) अनेक आजार होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया घरी बसून (Reduce Belly Fat Without Exercise) पोटाची चरबी (Belly Fat) कशी कमी करावी (Tricks To Reduce Belly Fat).

 

पोटातील या चरबीमुळे मधुमेह, हृदयरोग, स्ट्रोक (Diabetes, Stroke) आणि अगदी कर्करोगासह आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. आहारातील बदल आणि दररोजचा व्यायाम हा पोटातील चरबीपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग आहे. पण यानंतरही पोटाभोवती जमा झालेली चरबी कमी होण्याचं नाव घेत नसेल तर त्यासोबत आणखी काही गोष्टींकडेही लक्ष द्यावं लागतं. चला जाणून घेऊया (How to Lose Belly Fat Without Exercise) काही नैसर्गिक मार्गांबद्दल ज्याच्या मदतीने आपण वजन कमी करू शकतात (Tricks To Reduce Belly Fat).

लिंबाचा रस (Lemon Juice) : पोटाची चरबी घालवण्यासाठी सकाळी उठून आधी कोमट पाण्यात लिंबाचा रस प्यावा. त्यात मधही घालू शकता. लठ्ठपणा (Obesity) कमी करण्यासाठी हे प्रभावी ठरतेच, शिवाय चेहर्‍यावरही तेज आणते.

 

जिर्‍याचं पाणीही फायदेशीर (Cumin Water) : जिरे (Cumin) हे सहसा अन्नाची चव वाढविण्यासाठी वापरले जाते. परंतु वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी आपण त्याचे सेवन देखील करू शकता. यासाठी रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे भिजवून रात्रभर ठेवा. नंतर हे पाणी सकाळी उकळून गाळून थंड होऊ द्या. नंतर रिकाम्या पोटी प्यावे. हे पोटातील चरबी जाळण्यास मदत करते आणि वजन प्रभावीपणे कमी करते.

 

साखर कमी खा (Eat Less Sugar) : साखरेमध्ये जास्त कॅलरी असतात, जे आपल्या शरीरात वजन वाढवण्याचं काम करतं. म्हणून आपण पांढर्‍या साखरेपासून दूर राहणे आणि त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात साखर खाणे चांगले आहे जसे की फळांमध्ये होते. याशिवाय मध किंवा गुळाचा वापर करू शकतात.

संपूर्ण धान्य खा (Eat Whole Grains) : संपूर्ण धान्य म्हणजे चांगले फायबर,
अधिक पोषण आणि अधिक प्रथिने आणि कॅल्शियमचे सेवन करणे.
जास्त फायबरचे सेवन केल्याने आपले अन्न योग्य प्रकारे पचण्यास मदत होते.

 

पाणी जास्त प्या (Drink Plenty Water) : पाणी हे जीवनाचे अमृत आहे.
अतिरिक्त चरबीपासून मुक्त होण्यासाठी हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे.
दिवसातून किमान ८ ग्लास पाणी प्यावे.
असे केल्याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ (Toxic Substances)
बाहेर फेकले जातील आणि वजन कमी करण्यास मदत होईल.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Tricks To Reduce Belly Fat | try these 5 tricks to reduce belly fat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button