‘कोरोना’ काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं ‘हे’ चूर्ण ! जाणून घ्या इतर आरोग्यदायी फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   त्रिकटु चूर्णाचा वापर आयुर्वेदीक औषधात (Ayurvedic medicine) बऱ्यापैकी केला जातो. नावाप्रमाणेच त्रिकटु हे 3 मसाल्यांचं किंवा औषधी वनस्पतींचं मिश्रण आहे ज्याचा तीव्र परिणाम होतो. पिंपळी किंवा लांब मिरची, मिरपूड आणि कोरडं आलं किंवा सुंठ यांचं हे मिश्रण आहे. यामुळं पचनक्रिया सुधारते (Digestive process), यकृतीचं शुद्धीकरण आणि पित्त प्रवाह योग्य राहण्यासाठी याचा खूप फायदा होतो.

त्रिकटु चूर्ण हे पचन आणि श्वसन आरोग्याशी संबंधित विविध रोग आणि रोगांच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावतं. घशातील संक्रमण, त्वचारोग, सायनुसायटीस, जळजळ किंवा गॅस तयार होणं यांच्या उपचारांसाठी हे फायदेशीर आहे. त्रिकटुमध्ये आंल्कॅलोईड पाईपेरीन असतं ज्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. आज याच बद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

1) पचन वाढतं – अन्नपचन वाढण्यासाठी त्रिकटुचा खूप फायदा होतो. यामुळं पोषक द्रव्यांचं शोषणही वाढतं. ज्यांना पचनाची समस्या आहे त्यांनी जेवणाच्या एक तासापूर्वी अर्धा ते एक चमचा हे चूर्ण घ्यावं.

2) वजन कमी करण्यासाठी उपयुक्त – चयापचय वाढवण्यासाठी आणि लठ्ठपणा (Obesity) कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. सुधारीत पचन वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. त्रिफळासोबत जर याचं सेवन केलं तर वजन कमी होईल. यासाठी जेवण करण्यापूर्वी अर्धा तास एक चमचा त्रिकटु पावडर घ्या.

3) कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) पातळी कमी होते – त्रिकटु एक शक्तीशाली हायपोलिपिडेमिक एजंट आहे. या औषधी वनस्पतीत एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल, एकूण कोलेस्ट्रॉल आमि ट्रायग्लिसेराईडची पातळी कमी करण्याची क्षमता आहे. यामुळं चांगल्या एलडीएलची पातळी देखील वाढते. त्रिकटु लिपिड प्रोफाईल व्यवस्थित करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतं. जेवण करण्यापूर्वी अर्धा ते एक चमचा त्रिकटु पावडर घ्या.

4) थायरॉईड ( Thyroid) – त्रिकटु चूर्ण पावडर थायरॉईडच्या उपचारासाठीही उपयुक्त ठरू शकतं. 10 ग्रॅम गोदंती भस्म, 50 ग्रॅम त्रिकटु पावडरमध्ये मिसळा आणि 1 ते 2 ग्रॅम मधासह दिवसातून 2 वेळा घ्या.

5) अस्थमामध्ये (Asthma) फायदेशीर – याचा श्वसन रोग आणि दम्याच्या त्रासासाठी खूप फायदा होतो. दमा, सायनस आणि ब्राँकायटीस सारख्या रोगांसाठी त्रिकटुचा वापर केल्यानं फुप्फुसातून श्लेष्मा कमी होतो. कारण त्याचा परिणाम तीव्र असतो. जेवण करण्याच्या अर्धा तास आधी अर्धा चमचा त्रिकटु पावडर मधासोबत घ्या.

6) रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) – त्रिकटु पावडर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. यांचं सेवन केल्यानं शरीरात अग्नि प्रदीप्त होतो. यानं पचन योग्य होतं आणि भूक वाढते. जे लोक सारखे सारखे आजारी पडतात त्यांनी रोज झोपायच्या आधी एक चमचा त्रिकटु पावडर घ्यायला हवी.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.