Trimbakeshwar Temple Case | हुसेन दलवाईंनी प्रवेशद्वारावरुनच घेतलं त्र्यंबकेश्वराचं दर्शन, म्हणाले- ‘ते लोकांना काय शिकवतात, त्यांची चौकशी करा’

त्र्यंबकेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या (Trimbakeshwar Temple Case) इतर धर्मियांच्या प्रवेशावरून वाद सुरु आहे. उरुसाच्या मिरवणुकीत त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्यासाठी मुस्लिम बांधव मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आल्यानंतर हा वाद पेटला. या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) नेते हुसेन दलवाई (Husain Dalwai) ज्या उत्तर दरवाजाजवळ मुस्लिम बांधव पोहोचल्याने वाद झाला त्याच ठिकाणी पोहचून दर्शन घेतले. हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मंदिराच्या (Trimbakeshwar Temple Case) प्रवेशद्वारावर जाताच तिथल्या सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वाराजवळ बॅरिकेट्स लावली.

हुसेन दलवाई यांनी मंदिराच्या बाहेरून दर्शन घेतले, तसेच पायरीजवळ जाऊन हात जोडले आणि मोबाईलमध्ये मंदिराचे फोटोही काढले. मी मंदिरात जाणार नाही, म्हणत त्यांनी सुरक्षारक्षकांना सुनावलं. सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेशद्वाराजवळ अडवायला सुरुवात केली, मात्र हुसेन दलवाई यांनी प्रवेशद्वारातूनच दर्शन घेतले आणि माघारी फिरले.

यानंतर माध्यमांशी बोलताना हुसेन दलवाई म्हणाले, गेल्या 100 वर्षांपासून संदल आणण्याची परंपरा आहे. बाबा शाहजहाँ याचे संदल याठिकाणी येतं. महाराष्ट्रात जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ते पुढे म्हणाले, अश्लाघ्य शब्दांचा वापर केला जात आहे. तुम्ही एसआयटी नेमा, पण देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) सांगणं आहे की, ज्या लोकांनी मोर्चे काढले, अश्लाघ्य भाष्य वापरली त्यांच्याविरोधात काही तरी करा. येथील 10-12 संघटना आहेत त्यांची चौकशी करा, ते लोकांना काय शिकवतात, याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली.

शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा

हुसेन दलवाई पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी दिलेली देशाची घटना (Constitution) मोडून मनूस्मृती आणायची असेल तर हे देशाच्या विरोधात आहे. या देशात आता शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) पुन्हा जन्म घेणं आवश्यक आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi), ज्योतिबा फुले (Jyotiba Phule), आंबेडकर, साने गुरुजी (Sane Guruji) यांनी जन्म घेणं आवश्यक आहे. तर धार्मिक सलोखा राहील.

नेमका काय आहे प्रकार?

साधारण 13 मे रोजीची ही घटना असून त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple Case)
परिसरात भाविकांची रोजच दर्शनासाठी गर्दी होत असते.
त्या दिवशी उत्तर दरवाजाच्या दिशेने जात मंदिरात प्रवेश करायचा असल्याचे जमावाने सांगितले.
परंतु उपस्थित सुरक्षारक्षकांनी त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले.
यावेळी देवस्थानचे पदाधिकारी आणि पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद निवळला होता.
या घटनेनंतर दोन दिवसांनी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने पोलिसांना पत्रव्यवहार करत घटनेची चौकशीची मागणी केली.

 

Web Title :  Trimbakeshwar Temple Case | hussain dalwai reaches gate of tryambakeshwar temple
security on gate what happen

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा