तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या झाडून हत्या

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी घटनास्थळी धाव घेतली.

सत्यजीत बिश्वास हे कृष्णागंज मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूण आले होते. नाडीया जिल्ह्यात ही घटना घडली. सरस्वती मातेच्या पुजेदरम्यान त्यांच्यावर हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. गोळीबारानंतर त्यांना शक्तिनगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.